शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budget 2023: बजेटपूर्वी लोकांच्या रडारवर आहेत हे 4 शेअर, करून देऊ शकतात छप्परफाड कमाई! लगेच जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 8:39 PM

1 / 7
नवे वर्ष सुरू झाल्यापासूनच शेअर बाजारातील हालचालींना वेग आला आहे. यातच, केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादरेल. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. शेअर बाजारालाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
2 / 7
यावेळचा अर्थसंकल्प मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अशात सरकार वेगवेगळ्या सेक्टर्सवर फोकस करू शकते. यात डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग आदींचा समावेश असू शकतो. या अनुषंगाने आम्ही आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांतील अशा चार शेअर संदर्भात माहिती देणार आहोत, ज्यांवर लक्ष ठेवले जाऊ शकते.
3 / 7
Larsen & Toubro - इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन्स क्षेत्रालाही सरकारकडून मोठी आशा आहे. या बिझनेसमधील कंपन्यांना, यावेळच्या अर्थसंकल्पात सरकारकडून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशी आशा आहे. या क्षेत्रात Larsen & Toubro ही मुख्यकंपन्यांपैकी एक कंपनी आहे. तसेच ही कंपनी मोठ्या प्रोजेक्टसाठीही सहजपणे काम करू शकते.
4 / 7
Hero MotoCorp - देशात वाहनांची मागणी वाढत आहे. यामुळे सरकारकडून वाहनांसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. याच बरोबर सरकारकडून ग्रामीण भागांतही दुचाकींची मांगणी वाढविण्यावर जोर दिला जाऊ शकतो. याचा फायदा Hero MotoCorp ला होऊ शकतो.
5 / 7
HG Infra Engineering - यावेळच्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष इंफ्रास्ट्रक्चरवर असण्याचीही शक्यता आहे. अशात इंफ्रास्ट्रक्चरशी संबंधित असलेल्या कंपन्यांना फायदा मिळेल. यामुळे HG Infra Engineering लोकांच्या रडारवर आहे. ही कंपनी वॉटर आणि रेल्वे सारख्या सेक्टरमध्येही एंट्री करत आहे.
6 / 7
IRCON - यावेळच्या अर्थसंकल्पात सरकार रेल्वेशी संबंधित अनेक घोषणा करू शकते. अशात रेल्वेशी संबंधित कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. रेल्वेशी संबंधित कंपन्यांत IRCON चाही समावेश आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित घोषणांमुळे IRCON च्या ऑर्डर बुकवर येणाऱ्याकाळात सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
7 / 7
(टीप - येथे गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारBudgetअर्थसंकल्प 2023Stock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक