PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?
By प्रमोद सरवळे | Updated: January 27, 2023 18:14 IST
1 / 8आर.के. षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता2 / 8मोरारजी देसाई यांनी सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी एकूण 10 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले आहेत जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे.3 / 81973-74 मध्ये इंदिरा गांधी सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला 'काळा अर्थसंकल्प' म्हटले गेले. कारण त्या वर्षातील वित्तीय तूट 550 कोटी रुपये होती.4 / 8देश आर्थिक संकटात असताना मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक धुरा खांद्यावर घेतली होती. या अर्थसंकल्पाचे विशेष म्हणजे यावेळी 'लायसन्स राज' संपवून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्विकारले होते5 / 8यशवंत सिन्हा यांनी 1999 साली केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करून फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर करण्याऐवजी तो सकाळी 11 वाजता सादर करण्याची परंपरा सुरू केली.6 / 82017 मध्ये, फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी, अरुण जेटली यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू केली.7 / 81 फेब्रुवारी 2021 रोजी निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीच्या काळात पहिला पेपरलेस म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर केला.8 / 82023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२६ जानेवारी) अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रांची छपाई सुरू असताना पारंपारिक हलवा सोहळा साजरा करण्यात आला.