Budget 2024: From leather bag to tab... Budget's journey too
Budget 2024: चामडी पिशवी ते टॅब... बजेटचा असाही प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 8:47 AM1 / 5केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या गुरुवारी संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वांत पहिला अर्थसंकल्प १८६० साली मांडण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. एक काळ असा होता की, बजेट ब्रीफकेसमधून आणले जात असे. २०१९नंतर बजेट पेपरलेस बनले आहे. संसदेत सादर करण्यासाठी आता बजेट एका टॅबमधून आणले जाते. 2 / 5स्वतंत्र भारताचे पहिले बजेट आर. के. शनमुखम चेट्टी यांनी सादर केले होते. त्यावेळी ते बजेट एका चामड्याच्या बॅगेतून घेऊन आले होते. 3 / 5१९७०च्या दशकात अर्थमंत्र्यांनी बजेट एका हार्डबाऊंड बॅगेमधून आणणे सुरू केले. 4 / 5२०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन पहिल्यांदा ब्रीफकेसऐवजी लाल रंगाच्या वहीखात्यामध्ये घेऊन आल्या होत्या.5 / 5केंद्र सरकारने डिजिटायझेशनला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या बजेट टॅबच्या मदतीने सादर केले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications