शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंपर परतावा! 1 बोनस शेअर अन् टाटाच्या या स्टॉकनं ₹10 हजारचे केले ₹16 लाख; झुनझुनवाला, LIC चीही मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:04 PM

1 / 8
टाटा समूहाची कंपनी असलेल्या टायटनच्या शेअरने, आपल्या गुंतवणूकदारांचे नशीबच बदलले आहे. या शेअरने गेल्या 15 वर्षांत 44 रुपयांवरून 3600 रुपयांपर्यंतचा टप्पा गाठला आहे. या कालावधीत टायटनच्या शेअरने तब्बल 8000% हूनही अधिक परतावा दिला आहे.
2 / 8
टायटनने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 15 वर्षांत एकदा बोनस शेअरची भेटही दिली आहे. या बोनस शेअरच्या बळावर टायटनच्या शेअरने 10 हजार रुपयांचे आता 16 लाखहून अधिक केले आहेत.
3 / 8
₹10 हजारचे असे बनले ₹16 लाख - टायटनचा शेअर 9 एप्रिल 2009 रोजी 44.28 रुपयांवर होते. त्या वेळी एखाद्या व्यक्तीने या शेअर्समध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला कंपनीचे 225 शेअर्स मिळाले असते.
4 / 8
टायटनने जून 2011 मध्ये 1:1 या रेशोमध्ये बोनस शेअर दिले होते. अर्थात कंपनीने प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर दिला. अशा प्रकारे 10 हजार रुपयांना खरेदी केलेले शेअर, बोनस शेअर मिळाल्यानंतर 450 वर पोहोचले.
5 / 8
टायटनचा शेअर 12 एप्रिल 2024 रोजी 3619.70 रुपयांवर बंद झाला. अर्थात, या 450 शेअर्सचे मूल्य 16.28 लाख रुपये होते. या कॅलक्युलेशनमध्ये स्टॉक स्प्लिट आणि टायटनकडून दिल्या गेलेल्या डिव्हिडेंडचा समावेश नाही.
6 / 8
टायटनच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3885 रुपये एवढा आहे. तर,नीचांक 2559.30 रुपये एवढा आहे.
7 / 8
रेखा झुनझुनवालांकडे आहेत 4 कोटीहून अधिक शेअर- दिग्गज गुंतवमूकदार रेखा झुनझुनवालांकडे टायटनचे 4.76 कोटीहून अधिक शेअर आहेत. या कंपनीमध्ये त्यांची 5.37 टक्के एवढी गुंतवणूक आहे. तर, सरकारी विमा कंपनी LIC कडे टायटनचे 1.41 कोटीहून अधिक शेअर असून 1.60 टक्के एवढी हिस्सेदारी आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकTataटाटाStock Marketशेअर बाजार