शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बम्पर परतावा! या 20 पैशांच्या शेअरनं पाडला कोटींचा पाऊस, फक्त 2 वर्षांत 1 लाखाचे झाले ₹3.72 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 8:10 PM

1 / 7
खरे तर पेनी स्टॉकमध्ये मोठी जोखीम असते, मात्र, क्वालिटी शेअर असेल, तर बम्पर परतावा मिळू शकतो. आज आम्ही आपल्याला अशाच एका जबरदस्त स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देऊन करोडपती बनवण्याचे काम केले आहे आणि तेही केवळ 2 वर्षांत...
2 / 7
हा शेअर आहे राज रेयॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industries Ltd) चा. या कंपनीचा शेअर आज मंगळवारी BSE वर 74.59 रुपयांवर बंद झाला.
3 / 7
राज रेयॉन इंडस्ट्रीज शेअरची प्राइस हिस्ट्री - राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर प्राइस हिस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरने गेल्या एका वर्षात 4,712.26% एवझा परतावा दिला आहे. यादरम्यान याची किंमत 1.55 रुपये (22 मार्च 2022 ची बंद प्राइस) वरून सध्याच्या प्राईसपर्यंत पोहोचली आहे.
4 / 7
गेल्या दोन वर्षांचा विचार करता, हा शेअर 20 पैशांवरून (26 मार्च 2021) 74.59 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या काळात या शेअरने आपल्या शेअरहोल्डर्सना जवळापस 37,195% एवढा तगडा परतावा दिला आहे. यावर्षी YTD मध्ये हा शेअर आतापर्यंत 46% ने वधारला आहे. तसेच, गेल्या सहा महिन्यात या शेअरमध्ये 190% ची तेजी आली आहे.
5 / 7
गुतंवणूकदारांना 3 कोटींहून अधिकचा नफा - राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर प्राइस चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ही रक्कम वाढून 48.12 लाख रुपयांवर पोहोचली असती.
6 / 7
या प्रमाणेच, एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 20 पैशांच्या हिशेबाने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आजच्या तारखेला ही रक्कम वाढून 3.72 कोटी रुपयांपर्यंत गेली असती.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा