शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त नफा देणारा उद्योग! एका झाडापासून मिळू शकतात तब्बल 6 लाख रुपये, जाणून घ्या Business Idea

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 2:17 PM

1 / 9
आपण बिझनेस प्लॅनिंग करत असाल, तर आज आम्ही आपल्यासाठी एक खास आणि जबरदस्त बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. या बिझनेसमधून आपण जबरदस्त नफा मिळवू शकता. हा बिझनेस म्हणजे, चंदनाची शेती (Sandalwood Cultivation). चंदनाच्या शेतीतून शेतकरी कोट्यवधी रुपयांची कमाई करू शकतात. हा एक असा उद्योग आहे, ज्यापासून आपण काही वर्षांतच कोट्यधीश होऊ शकतात. जाणून घेऊयात या उद्योगासंदर्भात...
2 / 9
चंदनाची शेती करून आपण कोट्यवधी रुपये कमवू शकता. खरे तर चंदनाच्या झाडाची लागवड आपण संपूर्ण शेतातही करू शसकता. मात्र, आपल्याला इतरही पीक घ्यावे वाटत असले, तर आपण ही झाडे शेताच्या कडेला अथवा बांदावरही लावू शकतात. तज्ज्ञांच्या मते चंदनाच्या एका झाडापासून शेतकरी 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतात.
3 / 9
चंदनाची शेती करताना काही गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या झाडांना अधिक पाण्याची आवश्यकता नसते. यामुळे या झाडांची लागवड करताना ती नेहमीच जमीनीच्या वरच्या बाजूस करावी.
4 / 9
चंदनाचे रोप हे परजीवी असते, यामुळे त्याच्यासोबत होस्ट प्लांट लावणेही आवश्यक आहे. कारण चंदनाचे झाड एकटे जगू शकत नाही. तसेच चंदनाची लागवड केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते.
5 / 9
आपण चंदनाची लागवड केव्हाही करू शकता. मात्र, रोप लावताना ते दोन ते अडीच वर्षांचे असणे आवश्यक आहे. रोप दोन ते अडीच वर्षांचे असल्यास त्याची खराब होण्याची शक्यता कमी असते.
6 / 9
चंदनाचे झाड लावल्यानंतर पहिली 8 वर्षे त्याला कुठल्याही प्रकारच्या बाह्य संरक्षणाची आवश्यकता नसते. कारण त्या काळात झाडाला सुगंध नसतो. मात्र, यानंतर त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कारण आठ वर्षांनंतर झाडाच्या लाकडाचा सुगंध यायला सुरुवात होते.
7 / 9
एका रोपाची किंमत किती - चंदनाच्या लागवडीसाठी आपल्याला फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. चंदनाचे एक रोप फार तर 100 ते 130 रुपयांपर्यंत मिळते. याशिवाय त्याच्या सोबत आवश्यक असलेल्या होस्ट प्लांटची किंमतही साधारणपणे 50 ते 60 रुपये एवढीच असते.
8 / 9
सर्वात महाग लाकूड - चंदनाचे लाकूड हे सर्वात महागडे लाकूड मानले जाते. बाजारात चंदनाच्या लाकडाचा भाव 26 हजार ते 30 हजार रुपये किलो एवढा आहे. एका झाडापासून सुमारे 15 ते 20 किलो एढे लाकूड सहज मिळते. अर्थात एका झाडापासून 5 ते 6 लाख रुपये एवढा नफा सहज मिळू शकतो. मात्र, सध्या सरकारने चंदनाच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. यामुळे हे लाकूड केवळ सरकारच खरेदी करते.
9 / 9
कुठे होतो वापर - चंदनाच्या झाडाला बाजारात प्रचंड मागणी आहे. परफ्यूम क्षेत्रात चंदनाचा सर्वाधिक वापर होतो. याशिवाय आयुर्वेदातही चंदनाचा वापर केला जातो. महत्वाचे म्हणजे, ब्यूटी प्रोडक्ट्ससाठीही चंदनाला मोठी मागणी आहे.
टॅग्स :businessव्यवसायFarmerशेतकरी