शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Business Idea : ड्रॅगन फ्रुटच्या शेतीनं होईल मोठी कमाई, सरकारकडूनही मिळत आहे आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 9:47 AM

1 / 9
जर तुम्ही कोणता व्यवसाय करण्याच्या विचारात असाल आणि तुम्हाला शेतीद्वारे मोठी कमाई करू इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला एका फळाच्या शेतीबद्दल सांगत आहोत. या फळाची शेती करून तुम्ही मोठी कमाई करू शकता.
2 / 9
आम्ही तुम्हाला ड्रॅगन फ्रुटच्या शेतीबद्दल सांगत आहे. फायबर आणि पोषक तत्वे असलेल्या ड्रॅगन फ्रुटमुळे तुमची आर्थिक स्थितीही उत्तम होऊ शकते. ड्रॅगन फ्रुटची शेती भारतात फार कमी होती. दरम्यान, हरयाणा सरकार ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे.
3 / 9
हरयाणा सरकारनं शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख २० हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शेतीसाठी शेतकरी किमान १० एकर शेतीसाठी अनुदान घेऊ शकतात. सध्या ड्रॅगन फ्रुटला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकरी या फळाच्या शेतीद्वारे मोठी कमाई करू शकतात.
4 / 9
ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी अशाप्रकारची योजना आणणारं हरयाणा हे पहिलं राज्य ठरलं आहे. यात प्रति एकर ७० हजार रूपये ट्रेलिसिंग सिस्टम आणि ५० हजार रूपये ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी दिले जात आहेत. हरयाणा सरकारच्या वेबसाईटवर यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध आहे.
5 / 9
सरकारच्या वेबसाईटवर जाऊन याचा लाभ घेता येऊ शकणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी ३० हजार, दुसऱ्या वर्षी १० हजार आणि तिसऱ्या वर्षी १० हजार रूपये दिले जातील. १० एकरांमध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती करणाऱ्यांना सरकार १२ लाख रूपयांची आर्थिक मदत देत आहे.
6 / 9
ड्रॅगन फ्रुटची शेती करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. एका एकराच्या शेतात वार्षिक ८ ते १० लाख रूपयांची कमाई केली जाऊ शकते. परंतु सुरूवातीच्या कालावधीत यासाठी तुम्हाला ४ ते ५ लाख रूपयांपर्यंत खर्चही करावे लागू शकतात.
7 / 9
रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्त्रायल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते.
8 / 9
तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर  ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते.
9 / 9
ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असतं. जे शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी उपयोगी असतं. त्यामुळे सांधेदुखीवर ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होण्यासाठी मदत होते. 
टॅग्स :businessव्यवसायIndiaभारत