Business Idea: घरबसल्या दर महिन्याला कमवा 60000 रुपये; SBI सोबत अशा प्रकारे सुरु करा तुमचा व्यवसाय By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:36 AM
1 / 10 नोकरीच्या पगारात भागत नाही, अधिकचे उत्पन्न हवेय, मग स्वत:चा व्यवसाय सुरु करावा लागणार आहे. घरबसल्या तुम्ही दर महिन्याला 60000 रुपये कमवू शकणार आहात. ही संधी तुम्हाला एसबीआय (SBI) देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रँचायझी घेवून तुम्ही (SBI ATM Franchise) पगारापेक्षा जास्त कमाई करू शकणार आहात. 2 / 10 एटीएम बसविणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या असतात. कधीही एटीएम आपोआप लागत नाही. बँक आपल्याकडून काही कंपन्यांना एटीएम लावण्यासाठी कंत्राट देते. या कंपन्या ठिकठिकाणी एटीएम लावण्याचे काम करतात. तुम्ही देखील एटीएम फ्रँचायझी घेवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. 3 / 10 तुमच्याकडे 50-80 चौ. फुटांची जागा हवी. दुसऱ्या एटीएममधील अंतर 100 मीटरपेक्षा जास्त हवे. 4 / 10 ग्राऊंड फ्लोअर किंवा चांगल्या व्हिजिबिलिटीचे असावे. २४ तास वीज, 1 किलोवॅटचे कनेक्शन 5 / 10 एटीएममधून दिवसाला 300 ट्रान्झेक्शन व्हावेत. एटीएमच्या जागेवर काँक्रिटचे छत. वी सॅट लावण्यासाठी सोसायटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावे. 6 / 10 एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी काही कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. Tata Indicash, Muthoot ATM, India One ATM कडे हे अधिकार आहेत. 7 / 10 ऑफिशियल वेबसाइट - Tata Indicash – www.indicash.co.in , Muthoot ATM – www.muthootatm.com/suggestatm.html, India One ATM – www.india1atm.in/rentyourspace या लिंकवर जावे. 8 / 10 टाटा इंडिकॅश ही यामध्ये सर्वात जुनी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट घेते. हे रिफंडेबल असते. 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकूण गुंतवणूक 5 लाख रुपये होते. 9 / 10 कमाईबाबत बोलायचे झाले तर प्रत्येक कॅश ट्रान्झेक्शनवर 8 रुपये आणि नॉन कॅश ट्रान्झेक्शनवर 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर तुम्ही गुंतविलेल्या पैशांवर रिटर्न हा 33 ते 50 टक्के आहे. 10 / 10 समजा जर दर महिन्याला 250 ट्रान्झेक्शन झाले तर व त्यामध्ये जर 65 टक्के कॅश आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रान्झेक्शन असतील तर महिन्याला 45 हजार रुपये उत्पन्न मिळेल. जर रोज 500 ट्रान्झेक्शन झाले तर महिन्याला हेच उत्पन्न 88 ते 90 हजारावर जाते. आणखी वाचा