शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 2 लाखांत सुरू करा 'हा' खास बिझनेस, दर महिन्याला होईल 1 लाखाची कमाई; सरकारही करेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 5:41 PM

1 / 10
बरेच लोक म्हणताना दिसतात की, पैसे कमवणे फार कठीण काम आहे, हे खरेही आहे. पण, थोडे हुशारीने काम केले, तर तुम्ही कमी वेळात आणि कमी पैसे गुंतवून मोठ्या कमाईचा व्यवसाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायासंदर्भात माहिती देणार आहोत. (Fly ash bricks business)
2 / 10
या बिझनेससाठी आपल्याला केवळ 2 लाख रुपयांचीच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर आपण दर महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई करू शकाल. या व्यवसायाचे नाव आहे, फ्लाय अॅश ब्रिक्स. हा बिझनेस मोठा नफा देईल. तर जाणून घेऊया, या बिझनेसमधून आपण कशा प्रकारे बक्कळ पैसा कमावू शकता.
3 / 10
फ्लाय अॅश ब्रिक्सचा बिझनेस - या बिझनेसमध्ये राखेपासून वीट तयार केली जाते. सर्वसाधारणपणे या विटेला सिमेंटची विटही म्हणतात. आजकाल फ्लाय अॅश विटा, या मोठ-मोठ्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. या विटा, वीज प्रकल्पांमधून निघणारी राख, सिमेंट आणि दगडाची धूळ एकत्रित करून तयार केल्या जातात.
4 / 10
कोरोना काळात रिअल इस्टेटची स्थिती सर्वात वाईट होती. परंतु आता पुन्हा कामाला वेग आला आहे. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे. अशा स्थितीत या विटांचा व्यवसाय तुमच्यासाठी राखेतून पैसे कमवण्यासारखाच ठरू शकतो.
5 / 10
फक्त 2 लाख रुपये आणि 100 यार्ड जमिनीची आवश्यकता - या व्यवसायासाठी केवळ 100 यार्ड जमिनीचीच आवश्यकता असते. याच बरोबर आपल्याला 2 लाख रुपयांची गुंतवणूकही करावी लागेल. या व्यवसायातून आपण दरमहा एक लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. या व्यवसायासाठी साधारणपणे 5 ते 6 लोकांचीही आवश्यकता असले.
6 / 10
अशा प्रकारे आपण रोज सुमारे 3 हजार विटा बनवू शकता. तथापि, येथे गुंतवणूकीमध्ये कच्च्या मालाची किंमत समाविष्ट करण्यात आलेली नाही. कारण ती आपल्या प्रोडक्शननुसार बदलू शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
7 / 10
दर महिन्याला अशी होईल 1 लाख रुपयांची कमाई - या व्यवसायात आपण दर महिन्याला अगदी सहजपणे 1 लाख विटा तयार करू शकता. वीट बनविण्यापासून ते ती पूर्णपणे कोरडी होईपर्यंत 1 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजेच, पहिले 1 ते 2 महिने आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल.
8 / 10
यानंतर, आपण एका महिन्यात 1 लाख विटा विकल्या, तर मासिक कमाई 1 लाख रुपयांपर्यंत होऊ शकते. कारण प्रत्येक विटेवर तुम्ही किमान 1 रुपयाचा नफा मिळू शकता. या विटेची बाजारातील किंमत 5 ते 6 रुपये एवढी आहे. सध्या बांधकामाची कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे आपण एका महिन्यात 1 लाखपेक्षाही अधिक विटा विकू शकतात.
9 / 10
सरकारकडून लोनही मिळेल - हा व्यवसाय सुरू करण्याची आपली इच्छा असेल, पण त्यासाठी पैसे नसतील, तर आपण त्यासाठी मुद्रा लोन घेऊ शकता. हे लोन आपल्याला स्वयंरोजगार योजनेंतर्गत सहजपणे मिळेल.
10 / 10
दुसरीकडे, आपले काम वाढू लागले आणि आपण मॅन्युअल मशीनच्या सहाय्याने पुरेशा विटा बनवू शकत नसाल, तर 10 ते 12 लाख रुपये खर्च करून आपण स्वयंचलित मशिनही खरेदी करू शकता. या मशिनच्या सहाय्याने आपण दर तासाला 1 हजार विटा तयार करू शकता. म्हणजे, आपण दर महिन्याला 3 ते 4 लाख विटा सहजपणे तयार करू शकता.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाInvestmentगुंतवणूक