Business Idea Led Bulb Is A Good Option To Start Your Business Demand From Village To City
व्यवसाय सुरू करण्यासाठी 'हा' एक उत्तम पर्याय, खेड्यापासून शहरापर्यंत मागणी By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 11:39 AM1 / 8नवी दिल्ली : व्यवसाय सुरू करताना संबंधित प्रोडक्टची मागणी आणि बाजारपेठ पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्याची मागणी खेड्यापासून शहरापर्यंत आहे. त्याच बरोबर सरकारही यासाठी प्रोत्साहन देत आहे. 2 / 8सरकारने स्टार्ट-अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा लाभ घेता येईल. एलईडी बल्ब (LED Bulb) बनवण्याचा हा व्यवसाय आहे. एलईडी बल्बची मागणी खूप वाढली आहे. हे बल्ब आल्यानंतर रोषणाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यासोबतच विजेचे बिलही आटोक्यात आले आहे.3 / 8या एलईडी बल्ब व्यवसायाच्या कल्पनेमुळे (LED Bulb Business idea) अनेकांना रोजगारही मिळाला आहे, ज्यांचे प्रशिक्षण शासनाकडून दिले जाते. हा बल्ब टिकाऊ असतो आणि बराच काळ टिकतो. प्लास्टिकचा असल्याने तो तुटण्याची भीती नाही.4 / 8एलईडीला लाइट एमिटिंग डायोड म्हणतात. जेव्हा इलेक्ट्रॉन अर्धसंवाहक पदार्थामधून जातात, तेव्हा ते लहान कणांना प्रकाश देतात, त्याला एलईडी (LED) म्हटले जाते. हे सर्वात जास्त प्रकाश देतात. दरम्यान, एलईडी बल्बचे आयुष्य साधारणपणे 50000 तास किंवा त्याहून अधिक असते, तर सीएफएल बल्बचे (CFL Bulb) आयुष्य फक्त 8000 तासांपर्यंत असते.5 / 8विशेष बाब म्हणजे एलईडी बल्ब रिसायकल (recycled) करता येतात. एलईडीमध्ये सीएफएल बल्ब प्रमाणे पारा (mercury)नसतो, परंतु शिसे (lead) आणि निकेल (Nickel) सारखे घटक असतात.6 / 8अगदी नाममात्र गुंतवणुकीत तुम्ही एलईडी बल्बचा व्यवसाय सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत हा सर्वोत्तम व्यवसाय मानला जातो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक संस्था एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण देतात. आता सर्वत्र स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबत एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्या प्रशिक्षणही देतात. त्यांच्याशीही संपर्क साधता येईल.7 / 8एलईडी बल्ब बनवण्याच्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला एलईडीचे बेसिक, पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-टेस्टिंग, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितले जाईल. जर तुम्हाला हे छोट्या स्तरावर सुरू करायचे असेल तर ते फक्त 50,000 रुपयांमध्ये सुरू करता येईल. या कामासाठी तुम्हाला एखादे दुकान उघडण्याची गरज नाही, तुम्ही ते घरबसल्याही आरामात सुरू करू शकता.8 / 8एक बल्ब बनवण्यासाठी सुमारे 50 रुपये खर्च येतो आणि तो बाजारात 100 रुपयांना सहज विकला जातो. म्हणजेच एका बल्बवर दुप्पट नफा होतो. जर तुम्ही एका दिवसात 100 बल्ब बनवले तर थेट 5000 रुपये तुमच्या खिशात येतील. अशा परिस्थितीत, दरमहा 1.50 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications