शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वतःचा 'हा' व्यवसाय करा सुरू, होईल 15 लाखांची कमाई, सरकारही करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 1:03 PM

1 / 7
नवी दिल्ली : तुम्हाला तुमच्या नोकरीचा कंटाळा आला असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया (Best Business Idea) घेऊन आलो आहोत. या बिझनेस आयडियातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय कोणीही सुरू करू शकतो. चला तर या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया...
2 / 7
आज आपण आल्याच्या शेती (Ginger Farming) व्यवसायाबद्दल बोलत आहोत. आल्याचा वापर चहापासून भाज्या आणि लोणच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत केला जातो. याला वर्षभर बाजारात चांगली मागणी असते. या कारणास्तव, त्याला चांगली किंमत देखील मिळते.
3 / 7
विशेषतः हिवाळ्यात त्याला मोठी मागणी असते. या व्यवसायातून तुम्ही भरपूर नफा (profitable business) कमवू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या लागवडीसाठी केंद्र सरकारकडूनही (Central Govt) मदत मिळू शकते.
4 / 7
एक हेक्टरमध्ये आल्याची लागवड करण्यासाठी 2 ते 3 टन बियाणे आवश्यक आहे. आले लागवडीसाठी 6-7 पीएच असलेली जमीन सर्वात योग्य आहे. आल्याची लागवड बेड तयार करून करावी. त्याचबरोबर आल्याच्या लागवडीसाठी ठिबक पद्धतीचा किंवा ठिबक सिंचनाचा वापर उत्तम सिंचन तंत्रात केल्यास खूप चांगले परिणाम दिसून येतात.
5 / 7
आले लागवडीसाठी आधीच्या पिकाचे कंद वापरले जातात. मोठ्या आल्याचे तुकडे असे करा, जेणेकडून एका तुकड्यात दोन ते तीन कोंब येतील. यानंतर, लागवड करताना दोन लाइनमधील अंतर 30-40 सेंटीमीटर आणि रोपांचे अंतर 25 ते 25 सेमी ठेवावे. याशिवाय, आल्याचे कंद चार ते पाच सेंटीमीटर खोलीवर घातल्यानंतर ते हलकी माती किंवा शेणखताने झाकले पाहिजे.
6 / 7
आले लागवडीवरील शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जात आहे. मध्य प्रदेशचे फलोत्पादन विभाग मसाल्याच्या क्षेत्राच्या विस्ताराच्या योजनेवर काम करत आहे. जिथे सरकार शेतीसाठी 50टक्के अनुदान देते, म्हणजे जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रति हेक्टर. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत मदत दिली जात आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 70 टक्के कमाल रक्कम 70,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत दिली जात आहे.
7 / 7
एका हेक्टरमध्ये आले लागवडीसाठी जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्च होतात. एका हेक्टरमध्ये सुमारे 150 ते 200 क्विंटल आल्याचे उत्पादन होते. बाजारात आल्याचा भाव 80 ते 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. सरासरी 50 ते 60 रुपये गृहीत धरले तर एक हेक्टर 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल. सर्व खर्च वजा केल्यावरही तुम्हाला 15 लाखांचा नफा होईल.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसा