शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Business Idea:भारीच! 'हा' बिझनेस फक्त 25 हजारात सुरू करा, होईल 30 लाखांहून अधिक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:35 AM

1 / 7
सध्या नोकरी करणे अनेकांना आवडत नाही. अनेकजण नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करत आहेत. तुम्हीही व्यवसाय करण्याचे नियोजन करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 25 हजार रुपये गुंतवून दरमहा 3 लाखांपेक्षा जास्त कमवू शकता.
2 / 7
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते. हा एक खास व्यवसाय आहे - मोत्याची शेती. या व्यवसायातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.
3 / 7
हा व्यवसाय सुरू करताना सरकारकडून 50% पर्यंत सबसिडी मिळते. ऑयस्टर आणि मोत्याच्या व्यवसायाकडे लोकांची आवड वाढली असून, अनेकांना यातून भरपूर कमाईही होत आहे. या व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही.
4 / 7
यासाठी तुम्हाला तीन गोष्टींची गरज आहे - एक तलाव, ऑयस्टर ज्यापासून मोती बनवले जातात आणि प्रशिक्षण. त्यात सर्वात महत्वाचा तलाव आहे. तलावासाठी तुम्हाला सरकारकडून 50 टक्के सबसिडी उपलब्ध आहे. ऑयस्टर्स देशात कोणत्याही राज्यात भेटू शकते. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील ऑयस्टरची गुणवत्ता चांगली आहे. याच्या प्रशिक्षणासाठी देशात अनेक संस्था आहेत.
5 / 7
मोत्यांची लागवड करण्यासाठी, शिंपले जाळ्यात बांधले जातात आणि 10 ते 15 दिवस तलावामध्ये ठेवले जातात. यानंतर, ऑयस्टर बाहेर काढले जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये प्रत्येक ऑयस्टरच्या आत एक साचा घातला जातो. या साच्यावर लेप केल्यावर ऑयस्टरचा थर तयार होतो, जो नंतर मोती बनतो.
6 / 7
एक ऑयस्टर तयार करण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो आणि एका ऑयस्टरमधून 2 मोती बाहेर येतात. एक मोती 120 ते 200 रुपयांना विकला जातो.यात तो दर्जेदार असल्यास ते 200 रुपयांपेक्षा महाग विकले जाऊ शकते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या व्यवसायात मदत करू शकते. म्हणजे कमी गुंतवणुकीत तुम्ही जास्त नफा मिळवू शकता.
7 / 7
मोत्यांच्या शेतीसाठी एक एकर तलावात 25 हजार शिंपले टाकले तर सुमारे 8 लाख रुपये खर्च येतो. पण यापैकी काही ऑयस्टर खराबही असतात. तरीही 50% पेक्षा जास्त ऑयस्टर सहज बाहेर येतात. एका मोत्याची किंमत सुमारे 120 ते 200 रुपये आहे. यानुसार, सर्व खर्च वजा करून हा व्यवसाय सहजपणे वार्षिक 30 लाख रुपये कमवू शकतो.
टॅग्स :businessव्यवसायjobनोकरी