शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Business Idea Tips: शेतीसाठी सोडली बँकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी! व्यवसाय उभारला; आता करतोय लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 1:13 PM

1 / 12
बळीराजा अन्नदाता शेतकरी अतिशय कष्टातून पीक घेत असतो. आता पुन्हा एकदा तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी सरकारसह अनेक समाजातील विविध स्तरांतून प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. याशिवाय, प्रोत्साहनही दिले जात आहेत. (Business Idea Tips)
2 / 12
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे राहणाऱ्या कुलदीप बिष्ट यांनी शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवणारा कुलदीप आधी बँकेत काम करत होता. मात्र, शेतीची आवड असल्याने त्यांना बँकेच्या नोकरीवर पाणी सोडून मशरुमची शेती करण्याचा निर्णय घेतला.
3 / 12
कुलदीपच्या या निर्णयाला त्याचा सख्खा मित्रा प्रमोद जुयालने साथ दिली. सुरुवातीला दोघांनी नोकरी करुन साठवलेले पैसे खर्च करुन मशरुमची शेती केली. २०१५मध्ये नोकरी करत असतानाच एकाबाजूला उत्तराखंडच्या उद्यान विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून मशरुमची शेती कशी करतात याचे तंत्र अवगत करुन घेतले.
4 / 12
यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१७मध्ये नोकरी सोडून संपूर्ण वेळ ते शेती करु लागले. सुरुवातीच्या दिवसात कुलदीप सकाळी ऑफिसला जायचा. ऑफिस सुटल्यानंतर रात्री घरी आल्यानंतर शेतीची कामे करायचा.
5 / 12
आताच्या घडीला कुलदीप ऑयस्टर, मिल्कि, बटण यासारख्या मशरुमच्या विविध प्रजातींची लागवड करतो. जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने कुलदीपने बाय-प्रोडक्ट्स बनवायला सुरुवात केली आहे.
6 / 12
मशरुमच्या शेतीबरोबरच इतर पदार्थ बनवण्याकडेही त्यांने प्रयत्न सुरु केले आहेत. मशरुमपासून लोणचं, मुरंबा, बिस्किट, ड्राय पावडरसह अनेक प्रोडक्ट तो सध्या तयार करत आहेत.
7 / 12
येत्या काही दिवसांत तो नूडल्स आणि मशरुम च्यवनप्राश बनवण्याचा विचार करत आहे. याशिवाय, त्याच्या गावात तो अनेक फळांचे उत्पादनही घेत आहे.
8 / 12
तो आपली उत्पादने बाजारात फंन्गो या ब्रँडच्या नावाने विकतोय. यातून तो वर्षाला लाखों रुपयांची कमाई करत असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 12
कुलदीपने त्याच्या छोट्याश्या गावातील शेतकऱ्यांना मशरुमच्या शेतीचे मोफत प्रशिक्षण देत आहे. गावात त्यांचा मशरुमचे शेतकरी असा एक ग्रुपही तयार झाला आहे.
10 / 12
तर, याच शेतकऱ्यांकडून तो मशरुम विकत घेऊन त्याच्यापासून विविध उत्पादन विकत घेत आहे. त्यामुळं त्याच्या नफ्यात वाढ होतेय. आत्तापर्यंत त्याने २५०० लोकांना ट्रेनिंग दिली आहे.
11 / 12
मशरुमच्या शेतीतून कुलदीपने मोठा व्यवसाय उभा केला आहे. मागील वर्षी त्याने ३८ लाखांचा नफा मिळवला आहे. त्याचे उत्पादन दिल्ली आणि नागपूरसह देशातील इतर राज्यांतही विक्रीसाठी जातात.
12 / 12
येत्या काही काळात तो आंतरराष्ट्रीय बाजारातही उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शेतीकडे वळून लाखो रुपयांची कमाई करता येते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती