शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Money: ही आहेत अशी ७ कामं, ज्यात शून्य गुंतवणुकीतही होईल जबरदस्त कमाई, कशी? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 12:04 PM

1 / 7
कुठल्यातरी चांगल्या मार्गाने कमीत कमी गुंतवणुकीत आपल्याला घसघशीत कमाई व्हावी, असं अनेकांना वाटत असतं. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आवश्यक असते. जर तुम्ही नोकरी सांभाळून अन्य मार्गाने चांगली कमाई करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सुचवणार आहोत.
2 / 7
Fiverr हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुम्ही तुमच्याकडील कौशल्य फ्री मध्ये विकू शकता. Fiverr प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्याकडे असलैलं कौशल्य सर्वांसमोर आणू शकता. अनेक जण इथे त्यांची सक्सेस स्टोरी सांगून चांगली कमाई करत आहेत.
3 / 7
यूट्यूब हा जगातील सर्वात मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. २३० दशलक्षांहून अधिक यूझर्स दररोज यूट्यूबचा वापर करतात. यूट्यूबवर व्हि़डीओ बनवून तुम्हीही पैसे कमावू शकता. त्यासाठी तुमच्याकडे केवळ मोबाईल, डेस्कटॉप आणि इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. तुम्ही कुठल्याही विषयावर यूट्यूब चॅनेल बनवून कंटेंट तयार करायला सुरुवात करू शकता.
4 / 7
जर तुमच्या आपार्टमेंटमध्ये तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक एखादी खोली असेल तर तुम्ही कुठल्याही अतिरिक्त गुंतवणुकीशिवाय काही अतिरिक्त कमाई करण्यासाठी ही खोली भाड्याने देऊ शकता. त्यासाठी कुठल्याही रेंटल कंपनीशी भागीदारी करू शकता.
5 / 7
तुमच्याकडे एखादं वाहन असेल तर ते भाड्याने देऊन तुम्ही कमाई करू शकता. त्यासाठी तुम्ही एखाद्या कंपनीला ते वाहन भाड्याने देऊ शकता.
6 / 7
जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल. तसेच विविध वस्तू डिझाइन करण्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही 99designs, Creative Market, ThemeForest यांच्या माध्यमातून स्किलमधून पैसे कमावू शकता. या साइटवर तुम्ही ऑनलाइन डिझाइम विकून उत्त्पन्न कमाऊ शकता.
7 / 7
जर तुमच्याकडे फार मोठं कौशल्य नसेल मात्र तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर तुम्ही डाटा एंट्रीचं काम करू शकता. यासाठी कंपन्या दर तासाच्या आधारावर पैसे देतात. तुम्ही काम जेवढं अधिक कराल, तेवढं उत्पन्न अधिक मिळण्याची शक्यता असते.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाInvestmentगुंतवणूक