शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Business Ideas: यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हीही होऊ शकता मालामाल, करा केवळ हे काम, घरात पडेल पैशांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 2:27 PM

1 / 6
उन्हाळा सुरू झाला आहे. या उन्हाळ्यात तुम्ही कुठला नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या ऋतूमध्ये फायदेशीर ठरू शकेल, अशा व्यवसायांची माहिती देणार आहोत.
2 / 6
उन्हाळ्याचा दिवसांमध्ये लोकांना थंड गोष्टी खायला खूप आवडते. तसेच काही गोष्टींचा व्यवसाय हा अनेक वर्षे चालू शकतो. तुम्ही या उन्हाळ्याच्या हंगामात काही खास व्यवसाय करून भरपूर पैसे कमावू शकता. हे व्यवसाय पुढीलप्रमाणे आहेत.
3 / 6
कोल्ड ड्रिंकच्या व्यवसायामधून तुम्ही चांगली कमाई करू शकता. हा व्यवसाय उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. त्या माध्यमातून तुम्ही उन्हाळ्यामध्ये किमान २ ते ३ लाख रुपयांची कमाई करू शकता. तुम्ही घराजवळच हा व्यवसाय करू शकता. कोल्ड ड्रिंकच्या व्यवसायासाठी वर्दळ असलेली जागा उपयुक्त ठरते.
4 / 6
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बऱ्याच लोकांना लस्सी किंवा ताक पिणे आवडते. तसेच उन्हाळ्यामध्ये ते शरीरासाठी उपयुक्तही ठरते. खूप कमी गुंतवणुकीमधून तुम्ही हा उद्योग सुरू करू शकता. बाजारांमध्ये तुम्ही लस्सी आणि छास एकेक ग्लास विकून दररोज १००० ते १५०० रुपयांची कमाई करू शकता.
5 / 6
अनेक जण आपली प्रकृती जपण्यासाठी ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही ज्यूसचा व्यवसाय करूनही दररोज हजारो रुपये कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्ही घराच्या आसपास सुरू करू शकता.
6 / 6
उन्हाळा वाढल्यावर सर्वजण आईसक्रीमकडे वळतात. तुम्ही आईसक्रिम बनवण्याचा किंवा विकण्याच्या व्यवसायाकडे चांगला पर्याय म्हणून पाहू शकता. उन्हाळ्यात आईसक्रीमला मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत तुम्ही आईसक्रीम विकून हजारो रुपये कमाऊ शकता.
टॅग्स :businessव्यवसायSummer Specialसमर स्पेशल