शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 2:59 PM

1 / 7
आयफोन (IPhone) उत्पादक कंपनी चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या मार्गावर आहे. भारत आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये आपलं उत्पादन वाढवायचं असल्याचं कंपनीनं कंत्राटदार उत्पादकांना सांगितलं आहे.
2 / 7
सध्या अॅपलसमोर (Apple) चीनमधील कोरोनासंदर्भातील निर्बंधांची समस्या आहे. त्यामुळेच आता कंपनी चीनच्या बाहेर आपलं उत्पादन सुरू करण्याच्या विचारात आहे. चीनच्या बाहेर भारत ही अॅपलची पहिली पसंती आहे. अॅपलनं चीनची अँटी कोविड पॉलिसी आणि अन्य काही बाबींवर टीका केली आहे.
3 / 7
The Wall Street Journal च्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसंच यासाठी भारत आणि व्हिएतनाम हे पर्याय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या दोन्ही देशांमध्ये जागतिक उत्पादनाच्या तुलनेत विक्रीचा फार कमी हिस्सा आहे. परंतु कंपनी आता या देशांना चीनच्या पर्यायाच्या रुपात पाहत आहे.
4 / 7
विश्लेषकांच्या मते, बीजिंगची कम्युनिस्ट राजवट आणि अमेरिकेसोबतच्या संघर्षांमुळे अॅपलचे चीनवरील अवलंबित्व हा संभाव्य धोका आहे. तथापि, वॉल स्ट्रीट जर्नलने संपर्क साधला असता, ऍपलच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अॅपलच्या उत्पादन योजनेशी संबंधित लोकांच्या मते, मोठी लोकसंख्या आणि कमी खर्चामुळे कंपनी भारताकडे पर्यायाच्या रुपात पाहत आहे.
5 / 7
दुसरीकडे, चीनमध्ये मोठ्या संख्येने श्रमिक कामगार आहेत, जे अनेक आशियाई देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. Apple ने चीनमधील स्थानिक सरकारांशी मिळून काम केले आहे. त्यांच्या कंत्राटदारांकडे प्लांटमध्ये iPhone आणि इतर उपकरणे तयार करण्यासाठी पुरेशी जमीन, लोक आणि पुरवठा असावा हा यामागील उद्देश होता.
6 / 7
“वास्तविक पाहता आमची पुरवठा साखळी जागतिक आहे आणि त्यामुळे उत्पादने सर्वत्र तयार केली जातात. आम्ही देखील ऑप्टिमाइझ करणे सुरू ठेवतो,” असं टीम कुक यांनी यापूर्वी बोलताना म्हटलं होतं.
7 / 7
कोरोना महासाथीच्या आधीपासूनच अॅपल चीनमधून बाहेर पडण्याच्या विचारात होती. परंतु कोरोनाच्या महासाथीमुळे त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. आता कंपनी पुन्हा एकदा आपल्या कंत्राटदारांवर दबाव आणत असून त्यांना नव्या उत्पादन क्षमत शोधण्याचेही निर्देश देत असल्याची माहिती या विषयाच्या जाणकारांकडून देण्यात आली.
टॅग्स :Apple IncअॅपलchinaचीनIndiaभारत