शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त गायिकाच नसून बिझनेसवुमन आहेत कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्या अनन्या बिर्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 5:59 PM

1 / 8
अनन्या बिर्ला (Ananya Birla) या उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांच्या सर्वात मोठ्या कन्या आहेत. अलीकडेच त्यांची २५ वर्षीय भाऊ आर्यमन विक्रम बिर्ला यांच्यासह आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या (ABFRL) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2 / 8
अनन्या आणि आर्यमन ही बिर्ला कुटुंबाची पाचवी पिढी 60 बिलियन डॉलरच्या व्यवसायाच्या साम्राज्यात प्रवेश केला आहे. दरम्यान, अनन्या बिर्ला या गायिका, गीतकार आणि बिझनेसवुमन आहेत.
3 / 8
अनन्या बिर्ला यांनी 2016 मध्ये आपले डेब्यू साँग रिलिज केले. यामध्ये सीन किंग्स्टन, अफ्रोजॅक आणि मूड मेलोडीजसह प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे.
4 / 8
अनन्या बिर्ला यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून पूर्ण केले. तसेच, त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे.
5 / 8
2020 मध्ये अनन्या बिर्ला लॉस एंजेलिसमध्ये मॅवेरिक मॅनेजमेंटसोबत साइन करणाऱ्या पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत. याचबरोबर, अनन्या बिर्ला स्वतंत्र मायक्रोफिनच्या (Svatantra Microfin) संस्थापक आहेत.
6 / 8
स्वतंत्र मायक्रोफिन संस्था ही ग्रामीण भागातील महिलांना मायक्रो फायनान्स देते. याशिवाय, अनन्या बिर्ला Ikai Asai च्या संस्थापक आणि Mpower च्या सहसंस्थापक सुद्धा आहेत.
7 / 8
अनन्या बिर्ला यांना यंग बिझनेस पर्सनसाठी ET Panache Trendsetters of 2016 चा पुस्कार मिळाला आहे. त्यांना 2018 मध्ये GQ च्या सर्वात प्रभावशाली भारतीयांपैकी एक म्हणूनही त्यांची लिस्ट करण्यात आले होते.
8 / 8
दरम्यान, बिर्ला कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा व्यवसाय भारतासह परदेशात पसरलेला असून गेल्या 28 वर्षात आदित्य बिर्ला समूहाने 40 हून अधिक कंपन्या काबीज केला आहेत. संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, फोर्ब्सनुसार, कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती 14.8 अब्ज डॉलर आहे.
टॅग्स :businessव्यवसाय