buy a new house or car this festive season which bank is offering the cheapest loan
दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर किंवा कार घ्यायची आहे? कोणती बँक देतेय सर्वात सर्वात स्वस्त कर्ज By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:00 PM1 / 5सणासुदीच्या हंगामामुळे बहुतेक लोक काहीतरी खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु, पैशाअभावी काही लोकांना त्यांच्या इच्छेला मुरड घालावी लागते. अशा परिस्थितीत कर्ज घेणे हा उत्तम पर्याय आहे. तुम्हीही या सणासुदीच्या काळात कर्ज घेऊन काही मोठी खरेदी करणार असाल, तर ही माहिती कामी येईल.2 / 5तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ८.४० टक्के व्याजदराने गृहकर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. तुम्हाला दीर्घ परतफेड कालावधीचे कर्ज देखील मिळते. जर तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल तर तुम्ही ते ८.९५ टक्के व्याजदराने घेऊ शकता. तर वैयक्तिक कर्जाचे व्याजदर १०.८० टक्क्यांपासून सुरू होतात.3 / 5बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गृहकर्जाचे व्याजदर ८.३५ टक्क्यांपासून सुरू होतात. यामध्ये तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. तर कार कर्जावरील व्याजदर ८.७० टक्के आहे.4 / 5एचडीएफसी बँकेतील कार कर्जाचे व्याजदर ९.२५ टक्क्यांपासून सुरू होतात, ज्यामध्ये कोणतेही फोरक्लोजर शुल्क समाविष्ट नाही.5 / 5तुम्ही SBI कडून ८.५० टक्के व्याजदराने गृहकर्ज घेऊ शकता. बँक वैयक्तिक कर्जावर ८.६५ टक्के व्याजदर आकारते. यामध्ये तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications