Buy a stylish bike within 60 thousand, you will also like the mileage of hiro and bajaj byke
६० हजारांच्या आत खरेदी करा स्टाईलिश बाईक, मायलेजही कराल लाईक By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 12:21 PM1 / 8 सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येक वस्तू महाग झालीय, अगदी हातीतील मोबाईलपासून ते घरातील गॅस सिलेंडरपर्यंत महागाईच्या झळा आपल्याला सहन कराव्या लागत आहेत. 2 / 8गाडीत टाकणारे पेट्रोल आणि डिझेलही महागले असून दुचाकी गाड्यांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दहा एक वर्षांपूर्वी ५० हजारांच्या आता येणाऱ्या दुचाकी आज १ लाख रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. 3 / 8त्यामुळे, आज ६० रुपयांच्या बजेटमधील दुचाकींची माहिती तुम्हाला या आर्टीकलमधून वायायला मिळेल. हिरो कंपनीच्या हिरो मोटोकॉर्प पासून बजाजच्या बाइक्सचा यात समावेश आहे. त्यामुळे, स्वस्तातील मस्त बाईक तुम्हाला खरेदी करायला सहज सोपे जाईल. 4 / 8टीव्हीएसची बाइक TVS Radeon सर्वात स्वस्त मायलेजची बाइकच्या लिस्टमधील पाचवी बाइक आहे. जी आकर्षक डिझाइन सोबत येते. रेडियनची सुरुवातीची किंमत ५९ हजार ९२५ रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. या बाइक मध्ये १०९.७ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ८.०८ बीएचपीचे पॉवर आणि ८.०७ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. बाइकचे मायलेज ७३.६८ किमी प्रति लीटर आहे.5 / 8बजाज सीटी ११० एक्स. या बाइकची किंमत दिल्लीतील एक्स शोरूम, ५९ हजार १०४ रुपये आहे. या बाइकमध्ये ११५.४५ सीसीचे ४ स्ट्रोक बीएस६ इंजिन दिले आहे. जे यासोबत ४ स्पीड गियरबॉक्स मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही बाइक १०४ किमी प्रति लीटरचे मायलेज देते.6 / 8Bajaj Platina 100 ही या यादीतील तिसरी बाइक आहे. जी कमी बजेट मध्ये येते. आपल्या स्टायलिश डिझाइन आणि मायलेज साठी ओळखली जाते. प्लेटिनाची सुरुवातीची किंमत ५२ हजार ९१५ रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. बाइक मध्ये १०२ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.९ पीएसचे पॉवर आणि ८.३४ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकचे मायलेज कंपनीच्या माहितीनुसार, ८४ किमी प्रति लीटर आहे.7 / 8Hero HF 100 या सेगमेंट मध्ये सर्वात कमी किंमतीची बाइक आहे. जी किंमती शिवाय, मायलेज मध्ये चांगली आहे. या बाइकची सुरुवातीची किंमत ५६ हजार ९६८ रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. या बाइक मध्ये सिंगल सिलिंडरचे ९७.२ सीसीचे बीएस६ इंजिन दिले आहे. जे ८.०२ पीएसचे पॉवर आणि ८०५ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत ४ स्पीड गिअरबॉक्स दिले आहे. बाइकचे मायलेज ८३ किमी प्रति लीटर आहे.8 / 8 Hero HF Deluxe या लिस्टमधील दुसरी बाइक आहे. जी एचएफ १०० चे अपग्रेड व्हर्जन आहे. या बाइकची किंमत ५९ हजार ९९० रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) हिरो एचएफ १०० डीलक्स मध्ये कंपनीने ९७.२ सीसीचे इंजिन दिले आहे. यासोबत ४ स्पीड गिअरबॉक्स दिले आहे. हे इंजिन ८.०२ पीएसचे जास्तीत जास्त पॉवर आणि ८.०५ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकची मायलेज ८३ किमी प्रति लीटर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications