शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Buying Gold for Marriage : घरी लग्नकार्य आहे? ग्राहक म्हणून दागिने खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:29 AM

1 / 6
सोन्याचे दागिने खरेदी करताना सर्वांत महत्त्वाचा दागिन्यांचा अस्सलपणा. तो सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असतो. दागिन्याची शुद्धता तपासणे हाॅलमार्किंगमुळे सहज शक्य आहे. द ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डस(BIS) ही मान्यताप्राप्त कंपनी सोन्याच्या दागिन्यांना हाॅलमार्क प्रमाणपत्र देते. हा हाॅलमार्क असलेले दागिने घ्यावेत.
2 / 6
दागिना किती कॅरेटचा आहे, हे स्वत: पाहून खात्री करावी. यासाठी दागिन्यावर K(म्हणजे कॅरेट) हे अक्षर आणि त्यापुढे आकडा लिहिलेला असतो. उदा. २२K म्हणजे दागिन्यांमध्ये ९१.६ टक्के सोनं असतं.
3 / 6
सोने खरेदीला जाताना त्या दिवशीचे सोने खरेदीचे भाव पाहावेत. कारण सोन्याचे दर नेहेमी बदलतात.
4 / 6
सोन्याच्या दराबाबत सुवर्णकाराशी घासाघीस करता येत नाही. पण, दागिन्यांच्या घडणावळीचा दर सगळीकडे सारखा नसतो. घडणावळीचा दर हा सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असतो. मशीन मेड दागिन्यांच्या घडणावळीचा दर वेगळा असतो. कलात्मक पद्धतीनं तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ जास्त असते. सोन्याच्या दराच्या ६ टक्के ते १४ टक्के घडणावळ लावली जाते. कोरीव काम असल्यास हीच घडणावळ सोन्याच्या २५ टक्के इतकी लावली जाते. पण, या घडणावळीच्या रकमेत घासाघीस जरुर करावी.
5 / 6
साध्या दागिन्यांपेक्षा खडे जडवलेले दागिने छान वाटतात. पण, मग यामुळेही दागिन्यांचे भाव वाढतात. शिवाय दागिन्यांमधला खडा हा मौल्यवान आहे, हे तपासण्याठीचे काही निकषही नसतात. पण, जर खड्ड्यांचे दागिने घ्यायचेच असतील तर सोन्याचं वजन किती आणि खड्ड्याचं वजन किती हे वेगवेगळं पाहावं आणि मग असे दागिने खरेदी करावेत.
6 / 6
दागिने विकण्याची वेळ आल्यास ब्रॅण्डेड दुकानांना प्राधान्य द्यावं किंवा स्थानिक सुवर्णकारही ‘बायबॅक पाॅलिसी’ राबवितात. त्यात आपल्याकडील दागिन्यातील सोन्याचे १०० टक्के मोल मिळते. यात फसवणूक होऊ नये म्हणून दागिने विकण्यासाठी/मोडण्यासाठी शक्यतो आपण जिथून दागिने घेतले त्याच दुकानात जावं. दागिने विकताना/ मोडताना घडणावळ वजा केली जाते, हे लक्षात असू द्यावं.
टॅग्स :Goldसोनंmarriageलग्न