शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 10:11 AM

1 / 7
Iran Isreal Tension : इराण आणि इस्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. इस्रायलने इराणसमर्थित हमास, हौथी आणि हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनांवर कारवाई केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं मंगळवारी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यानंतर इस्रायलनंही त्यांना योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली.
2 / 7
यात इस्रायलला पाठिंबा देण्याचंही अमेरिकेनं म्हटलं आहे. म्हणजेच येत्या काळात इराणला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं जाऊ शकतं. देशातील जनता आधीच प्रचंड महागाईनं त्रस्त आहे.
3 / 7
इराणची लोकसंख्या इस्रायलच्या १० पट आहे. २०२२ मध्ये इराणची जीडीपी साईज ४१३ अब्ज डॉलर्स होती. तर इस्रायलची अर्थव्यवस्था ५२५ अब्ज डॉलर होती. इस्रायलच्या हल्ल्याला इराणची अर्थव्यवस्था तोंड देऊ शकेल का, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
4 / 7
इराणच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे कच्चं तेल. पण अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी इराणवर आधीच अनेक निर्बंध घातले आहेत. यामुळे देशाच्या चलनाच्या मूल्यात लक्षणीय घट झाली आहे. एक भारतीय रुपया ५०१.२४ इराणी रियाल इतका आहे.
5 / 7
देशात महागाई शिगेला पोहोचली असून इस्रायलने हल्ला केल्यास तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते. पाश्चिमात्य निर्बंधांमुळे इराणमधील लोकांचे राहणीमान कमालीचं घसरलं आहे. देशाच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा ४७ टक्के, उद्योग क्षेत्राचा वाटा ४० टक्के आणि कृषी क्षेत्राचा वाटा १२.५ टक्के आहे.
6 / 7
देशातील औद्योगिक क्षेत्राचा सर्वाधिक महसूल ऑईल उद्योगातून मिळतो. इराणच्या इंधनाच्या निर्यातीत चीनचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक आहे. पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली असली तरी इराण आणि चीनमधील इंधनाच्या व्यापारावर कोणताही परिणाम झालेला नाही. पण इस्रायल देशाच्या इधनाच्या तळांना लक्ष्य करू शकतो, अशी भीती इराणच्या अधिकाऱ्यांना आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेवर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड आणि इस्लामी संघटनांचे नियंत्रण आहे. ते कर भरत नाहीत आणि हिशोबही देत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता नाही.
7 / 7
इराण इस्रायलशी फार काळ युद्ध करण्याच्या स्थितीत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच इस्रायलशी उघड युद्ध करण्याऐवजी प्रतिकात्मक हल्ला चढवत आहे. इराणची लोकसंख्या सुमारे ९ कोटी, तर इस्रायलची लोकसंख्या ९५ लाख आहे. इराणचं संरक्षण बजेट ९.९ अब्ज डॉलर आहे, तर इस्रायलचे २४.४ अब्ज डॉलर आहे. इराणचं दरडोई उत्पन्न ५,३१० डॉलर तर इस्रायलचं ५३.३७ हजार डॉलर आहे. इस्रायल दीर्घकाळ युद्ध लढण्याच्या स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं असून ते करणं इराणसाठी सोपं नाही.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलbusinessव्यवसाय