शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 3:35 PM

1 / 8
ऑनलाइन शॉपिंग करण्याकडे सध्या कल वाढलेला दिसत आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी ही डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांतच करता येते. मात्र ऑनलाइन शॉपिंग करणं थोडं धोकादायक आहे. शॉपिंग करताना एखादी छोटीशी चूक झाली तरी ती खूप महागात पडू शकते. ऑनलाइन शॉपिंग करताना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
2 / 8
ऑनलाइन पैशाचे व्यवहार करताना वैयक्तिक संगणक किंवा लॅपटॉपचा वापर करा. कारण इतर व्यक्तींच्या साधनांचा वापर केल्यास बऱ्याचवेळा महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना प्रामुख्याने तुमच्या उपकरणांचा वापर करा.
3 / 8
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा बँकिंगचे डिटेल्स कधीही जीमेल किंवा गुगल ड्राइव्हवर सेव्ह करू नका. कारण जीमेल अकाउंट हॅक करून फसवणूक केली जाण्याची शक्यता अधिक असते. तसेच गुगल अकाउंटला मोबाइल नंबर आणि काही महत्वाचे डिटेल्स सिंक केलेले असतात. त्यामुळे हॅकर हे डिटेल्स वापरून इतर व्यवहार करू शकतात.
4 / 8
बँकेतून फोन केला असून तुमच्या बँक खात्याची माहिती द्या असे सांगणारे अनेक फोन हे येत असतात. मात्र अशा फोनला प्रतिसाद देऊ नका. त्याचप्रमाणे फोनवर मेसेज अथवा ई-मेलच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीशी कार्डचे डिटेल्स शेअर करू नका.
5 / 8
फेसबुकवर किंवा दुसर्‍याच एखाद्या साइटवर आहात तिथे जाहिरात म्हणून एखादी लिंक येते. पॉप अप विंडो उघडते, इंटरेस्टिंग ऑफर्स दिसतात म्हणून क्लिक करून अनेक जण त्या साइटवर जातात. मात्र या मार्गाने त्या साइटवर शॉपिंग करू नका. ऑनलाइन शॉपिंग करायचं असेल तर त्या साइटचं नाव दुसर्‍या नव्या स्वतंत्र अ‍ॅड्रेसबारमध्ये टाइप करा. स्वतंत्र साइट उघडली तर सगळ्या गोष्टी नीट तपासून पाहा.
6 / 8
पैशाचे व्यवहार करताना वेबसाईटच्या यूआरएलमध्ये सर्वप्रथम 'एचटीटीपीएस' आहे की नाही हे तपासून पाहा. तसेच परदेशात जाण्याचा सध्या विचार नसेल तर तो पर्यंत international transaction डिसेबल ठेवा. कारण international transaction डिसेबल ठेवणं सुरक्षित आहे.
7 / 8
डेबिट किंवा क्रेडीट कार्डने ऑनलाइन शॉपिंग केली जाते. पण खरेदी केल्यानंतर साईन अप करतानाच 'verified by Visa' किंवा 'master secured code program(s)' यापैकी एका ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा शॉपिंग कराल तेव्हा ते व्यवहार फक्त तुम्हीच ऑथराईज्ड करू शकता.
8 / 8
ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांवर ऑनलाइन चोरांचं लक्ष असतं. त्यामुळे कधीतरी तुम्ही शॉपिंग केल्यावर तुम्हाला एखादा मेल येऊ शकतो. पैसे देण्यासाठी हा नंबर सांगा अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र त्याला उत्तर देऊ नका. तसेच मेलही पाठवू नका. त्या साइटच्या कस्टमर केअरला फोन करा. त्यांनी अशी ई-मेल पाठवला आहे का याची खात्री करा.
टॅग्स :onlineऑनलाइनbusinessव्यवसाय