शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CarTrade च्या गुंतवणूकदारांना झटका; काही मिनिटांतच कमाईची योजना झाली फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 6:04 PM

1 / 10
ग्राहकांना वाहने खरेदी आणि विक्रीसाठी व्यासपीठ प्रदान करणाऱ्या कार ट्रेड टेक या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.
2 / 10
वास्तविक, कंपनीचं शेअर बाजारात कमकुवत लिस्टिंग झालं आहे. जे गुंतवणूकदार या आयपीओद्वारे प्रचंड नफा कमावून कंपनीतून बाहेर पडण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी ही वाईट बातमी आहे.
3 / 10
एनएसई इंडेक्सबद्दल सांगायचं झालं तर कंपनीचे शेअर्स १५९९ रूपये प्रति शेअर्सवर लिस्ट झाले. परंतु याची इश्यू प्राईज १६१८ रूपये होती. बीएसई इंडेक्सवर लिस्टिंगनंतर कार ट्रेडचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं.
4 / 10
शेअर बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १५००.१० रूपयांवर बंद झाला. कंपनीच्या मार्केट कॅपिटलबद्दल सांगायचं झालं तर ती ७ हजार कोटी रूपयांपेक्षा कमी आहे.
5 / 10
कार ट्रेड टेकच्या आयपीओला अखेरच्या दिवशी जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. अखेरच्या दिवशी आयपीओ २०.२९ टक्के सबस्क्राईब झाला होता.
6 / 10
११ ऑगस्ट रोजी बंद झालेल्या तीन दिवसीय इश्यूमध्ये २६,३१,७४,८२३ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. परंतु ऑफरसाठी केवळ १,२९,७२,५५२ शेअर्स होते.
7 / 10
क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स कॅटेगरीसाठी ३५.४५ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. जर अन्य बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ४१ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या हिस्स्याला २.७५ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.
8 / 10
२००९ मध्ये स्थापन झालेली कंपनी वॉरबर्ग पिनकस, तेमासके, जेपी मॉर्गन आणि मार्च कॅपिटलसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचं समर्थन आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना जुन्या गाड्यांसह नव्या कार्सची खरेदी विक्रीही उपलब्ध करून देते.
9 / 10
ऑनलाईन कारट्रेड टेकचा आयपीओ ९ ऑगस्ट रोजी खुला झाला होता उघडला आहे. हा आयपीओ ११ ऑगस्ट पर्यंत खुला होता. याचा प्राईज बँड १५८५-१६१८ रूपयांदरम्यान निश्चित करण्यात आला होता.
10 / 10
पहिल्या सत्रातही कमकुवत लिस्टिंग झाल्यानंतर या शेअरची घसरण कायम होती. शेअर बाजाराच्या अखेरच्या सत्रार हा शेअर तब्बल १५००.१० रूपये प्रति शेअर इतका खाली आला होता.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगMONEYपैसाInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजार