शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 2:29 PM

1 / 8
मोदी सरकारने जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनांची खासियत म्हणजे, केवळ लहान मुलेच नाही, तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता योतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा अनेक योजना आहेत, ज्यांत अधिक चांगल्या प्रकारे व्याज देण्यात आले आहे.
2 / 8
सध्या एका सरकारी स्कीममध्ये आपल्याला दर महिन्याला 18,500 रुपयांचा फायदा मिळत आहे. मात्र 1 एप्रिल नंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मोदी सरकार ही योजना बंद करण्याच्या तयारीत आहे.
3 / 8
1 एप्रिलपासून मिळणार नाही फायदा - या योजनेचे नाव आहे, पंतप्रधान वय वंदना योजना. आता या योजनेचा लाभ आपल्याला केवळ 1 एप्रिलपर्यंतच घेता येणार आहे. या योजनेत 7.4 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळते.
4 / 8
काय आहे ही योजना? - पंतप्रधान वय वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र ही योजना आता 1 एप्रिल 2023 पासून बंद होईल. या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
5 / 8
या योजनेत आपण 10 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आपण 10 वर्षांपर्यंत पेन्शनचा लाभ घेऊ शकता. मॅच्युरिटीनंतर आपल्याला आपण गुंतवणूक केलेला संपूर्ण पैसा मिळतो.
6 / 8
कसे मिळतील 18500 रुपये? जर एखाद्या जोडप्याने (पती-पत्नीने) या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली, अर्थात 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर यावर त्या जोडप्याला 7.40 टक्के दराने व्याज मिळेल. या रकमेवर आपल्याला वर्षाला एकूण 222000 रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील. जर या व्याजाच्या रकमेला 12 महिन्यांनी भागले तर आपल्याला दर महिन्याला 18500 रुपये मिळतील आणि ही रक्कम पेन्शनच्या स्वरुपात आपल्या खात्यात येईल.
7 / 8
आपण एकटेही घेऊ शकता या योजनेचा लाभ - जर केवळ एकाच व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर ती व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयांचीच गुंतवणूक करू शकते. यावर आपल्याला वर्षाला 111000 रुपये एवढे व्याज मिळेल. म्हणजेच आपल्या खात्यात दर महिन्याला 9250 रुपये येतील.
8 / 8
10 वर्षांनंत परत मिळतात पैसे - या योजनेचा मॅच्युरिटी पिरिअड 10 वर्षांचा आहे. आपण 10 वर्षांसाठी या योजनेत पैसे गुंतवू शकता. जर या योजनेत आपण 10 वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक केली, तर 10 वर्षांनंतर आपण गुंतवणूक केलेले पैसे आपल्याल्या परत मिळतात.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारhusband and wifeपती- जोडीदारPensionनिवृत्ती वेतन