central govt withdraws bpcl privatization public field oil marketing company
मोदी सरकारची माघार! BPCL चे खासगीकरण करणार नाही; नेमकं कारण काय? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 9:59 AM1 / 9गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सरकारी कंपन्या, बँका यांचे मोठ्या प्रमाणावर खासगीकरण, निर्गुंतवणुकीकरण सुरू असल्याचे दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर करतानाच यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. 2 / 9कोरोनासह अन्य आघाड्यांवरील आव्हानांमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. मात्र, यातच आता आघाडीची पेट्रोलियम कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात BPCL च्या निर्गुंतवणुकीचा निर्णय सरकारने स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 3 / 9केंद्र सरकारने BPCL मधील आपला संपूर्ण ५२.९८ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली होती आणि मार्च २०२० मध्ये गुंतवणूकदारांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.4 / 9या प्रक्रियेत नोव्हेंबर २०२० पर्यंत किमान तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. परंतु इतरांनी त्यांच्या बोली मागे घेतल्यावर फक्त एकच बोली शिल्लक राहिली.5 / 9मात्र, BPCL मधील संपूर्ण ५२.९८ टक्के हिस्सेदारी विकून तिचे खासगीकरण करण्याच्या प्रक्रियेतून सरकारने माघार घेत असल्याचे जाहीर केले. जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील प्रतिकूल वातावरणामुळे कोणी खरेदीदार पुढे येण्याची शक्यता नसल्याने असा निर्णय घेणे सरकारला भाग पडल्याचे सांगितले जात आहे. 6 / 9आधी करोना महामारीच्या एकामागून एक सुरू राहिलेल्या लाटा आणि त्यानंतर आता युरोपातील युद्धामुळे अस्थिर बनलेली भू-राजकीय स्थिती यांनी जगाच्या ऊर्जा बाजारपेठ, विशेषत: तेल व वायू क्षेत्रावर विपरीत परिणाम साधला. 7 / 9एकच स्पर्धक रिंगणात उरल्याने खासगीकरणाची ही प्रक्रिया थांबवत असल्याचे सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’ला जाहीर करावे लागले. हे लक्षात घेता, निर्गुतवणूक विषयावरील मंत्रिगटाने बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुतवणुकीसाठी सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. 8 / 9पात्र बोलीदारांकडून प्राप्त झालेले इरादापत्रे रद्दबातल ठरतील, असे ‘दीपम’कडून स्पष्ट करण्यात आले. कंपनीच्या धोरणात्मक निर्गुतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय परिस्थितीच्या पुनरावलोकनाच्या आधारे योग्य वेळी घेतला जाईल, असेही या विभागाने म्हटले आहे.9 / 9BPCL कंपनीचा समभाग गुरुवारी ०.५४ टक्के घसरणीसह बीएसई ३२४.२५ रुपयांवर स्थिरावला. या भावानुसार बीपीसीएलचे ७०,३५९ कोटी रुपये बाजार भांडवल होते. आणखी वाचा Subscribe to Notifications