central modi govt give a chance to win rs 15 lakh from home check the all details
मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ 'हे' काम By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 4:18 PM1 / 11कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जणांचे रोजगार गेले. इंधनदरवाढ, महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. 2 / 11कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अर्थचक्र सुरू राहावे, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. 3 / 11काही कंपन्यांना कोरोनाच्या कालावधीत भरघोस नफा झाल्याचे दिसत असून, अनेक कंपन्यांनी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, मोदी सरकार तुम्हांला घरबसल्या १५ लाख रुपये कमावण्याची सुवर्ण संधी देत आहे. 4 / 11आपल्याला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. केंद्र सरकार तब्बल १५ लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. मायगोव्ह इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.5 / 11केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ मध्ये केंद्राने पायाभूत सुविधांच्या निधीसाठी विशेषतः विकास वित्तीय संस्था (DFI) स्थापन करण्याची योजना जाहीर केली होती. राष्ट्रीय पायाभूत सुविधा अंतर्गत २०२५ पर्यंत एकूण ७ हजार प्रकल्पांवर १११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची केंद्राची योजना आहे.6 / 11वित्त सेवा मंत्रालय, वित्त मंत्रालयाने DFI संस्थेचे नाव, त्यासाठी एक टॅगलाइन आणि लोगो डिझाइन सुचविण्यासाठी लोकांना आमंत्रित केले आहे. संस्थेचे नाव, लोगो आणि टॅगलाइन त्याच्या कार्याशी संबंधित असावी. 7 / 11नाव, टॅगलाइन आणि लोगो विकास आर्थिक संस्था स्थापनेमागील हेतू दर्शवितात आणि ते काय करेल याचा स्पष्ट मार्कर असावा. हे प्रत्यक्षात व्हर्च्युअल स्वाक्षरीसारखे असले पाहिजे, जे लक्षात ठेवणे आणि उच्चारणे सोपे आहे. 8 / 11तीनही नावे, टॅगलाइन आणि लोगो त्यांच्या स्वत: च्या भिन्न असावेत, परंतु एक एकत्रित दृष्टिकोन दर्शवितात. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याला प्रथम mygov.in पोर्टलवर जावे लागेल. येथे आपल्याला स्पर्धेत जा आणि लॉगिन टू पार्टिसिपेट टॅबवर क्लिक करावे लागेल. 9 / 11यानंतर नोंदणीचा तपशील भरावा लागेल. नोंदणीनंतर आपल्याला आपली माहिती सबमिट करावी लागेल. यात संस्थेचे नाव सुचविण्यासाठी पहिले पारितोषिक ५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ३ लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक दोन लाख रुपये आहे. 10 / 11टॅगलाईनचे पहिले पारितोषिक ५ लाख रुपये, दुसरे पारितोषिक ३ लाख आणि तृतीय पारितोषिक २ लाख रुपये आहे. तसेच लोगोचे पहिले पारितोषिक ५ लाख रुपये, दुसरे पारितोषिक ३ लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक २ लाख रुपये आहे.11 / 11टॅगलाईनचे पहिले पारितोषिक ५ लाख रुपये, दुसरे पारितोषिक ३ लाख आणि तृतीय पारितोषिक २ लाख रुपये आहे. तसेच लोगोचे पहिले पारितोषिक ५ लाख रुपये, दुसरे पारितोषिक ३ लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक २ लाख रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications