शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या आठवड्यात बंपर कमाईची संधी, येणार 'या' कंपन्यांचे IPO; पाहा संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 2:56 PM

1 / 7
या आठवड्यात शेअर बाजारात बंपर कमाईची संधी मिळणार आहे. तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात दोन कंपन्यांचे आयपीओमध्ये खुले होणार आहेत.
2 / 7
यापूर्वी अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ बाजारात आणले. यापैकी काही आयपीओंनी गुंतवणूकदारांची चांदी केलीये. तर दुसरीकडे काही आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना नुकसानही सोसावं लागलंय.
3 / 7
या वर्षी आतापर्यंत ५७ एमएसई आणि ६ मेनबोर्ड कंपन्यांचे आयपीओ नॉकआउट झाले आहेत. त्यापैकी मॅनकाइंड फार्माच्या आयपीओची साईज सर्वात मोठी होती. या फार्मा कंपनीने आयपीओद्वारे ४३०० कोटी रुपये उभे केले. जर तुम्हाला यात संधी मिळाली नसेल तर टेन्शन घेून नका. या आठवड्यात कोणत्या कंपन्यांचे IPO येत आहेत ते पाहू.
4 / 7
एलईडीशी निगडीत सेवा पुरवणारी नोएडा बेस्ड कंपनी आयकियो लायटिंगच्या आयपीओमध्ये ८ जून २०२३ पर्यंत गुंतवणूकीची संधी आहे. हा आयपीओ मंगळवार ६ जून रोजी खुला होईल.
5 / 7
यामध्ये इश्यू फॉर सेल आणि नवीन शेअर्स दोन्ही असतील. कंपनी आयपीओद्वारे पैसे जमवून गुंतवणूक करेल आणि कंपनीवरील कर्जही फेडेल. ६ जून रोजी हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला राहिल आणि ८ जून रोजी बंद होईल. IKIO Lighting आयपीओची किंमत २७०-२८५ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
6 / 7
तर दुसरा आयपीओ सोनालिस कंझ्युमरचा आहे. हा एक एसएमई आयपीओ आहे. ७ जून रोजी हा आयपीओ खुला होईल आणि ९ जून रोजी बंद होईल. यामध्ये ९.४४ लाख फ्रेश शेअर्स जारी केले जातील. याची किंमत ३० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.
7 / 7
या आयपीओचा लॉट साईज ४ हजार शेअर्सचा आहे. त्यामुळे एका गुंतवणूकदाराला किमान १.२० लाख रुपये गुंतवावे लागतील. (टीप- यामध्ये केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक