शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डेबिट-क्रेडिट कार्डपासून LIC पर्यंत; 1 ऑक्टोबरपासून पैशांशी संबंधित 6 बदल होणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 7:53 PM

1 / 7
Changes from 1st October : सप्टेंबरप्रमाणेच ऑक्टोबरमध्येही अनेक फायनान्शिल डेडलाईन्स येत आहेत. पुढील महिन्यात पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामध्ये नवीन TCS नियम, विशेष FD डेडलाइन, नवीन डेबिट कार्ड नियमांसह इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला पैशाशी संबंधित 6 महत्त्वाच्या बदलांबद्दल सांगणार आहोत, जे ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहेत.
2 / 7
1. TCS नियम लागू होईल- टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (TCS) चे नवीन दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होतील. आर्थिक वर्षात तुमचा खर्च एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला TCS भरावा लागेल. मग तुम्ही परदेशात प्रवास करत असाल, परदेशी इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असाल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) तुम्हाला एका आर्थिक वर्षात $2,50,000 पर्यंत पाठवण्याची परवानगी देते. 1 ऑक्टोबर 2023 पासून, 7 लाख रुपयांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय रेमिटन्सवर 20% ची TCS लागू होईल.
3 / 7
2. डेबिट-क्रेडिट कार्डवर नवीन नियम- RBI ने प्रस्ताव दिला आहे की, तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स आणि प्रीपेड कार्ड्ससाठी नेटवर्क प्रोव्हाडर निवडू शकता. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता, त्या क्षणी नेटवर्क प्रोव्हायडर कार्ड कंपनी ठरवते. RBI ला बँकांना 1 ऑक्टोबरपासून अनेक नेटवर्कवर कार्ड ऑफर करायचे आहेत आणि ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय द्यायचा आहे. त्यामुळे कार्ड घेताना किंवा नंतर ग्राहक या पर्यायाचा वापर करू शकतात.
4 / 7
3. इंडियन बँक स्पेशल एफडी डेडलाइन- बँकेच्या वेबसाइटनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने 'इंड सुपर 400' आणि 'इंड सुप्रीम 300 दिवस' विशेष एफडी उच्च व्याज दरांसह वाढवल्या आहेत. या योजनांची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5 / 7
4. SBI WeCare अंतिम मुदत- ज्येष्ठ नागरिक 1 ऑक्टोबरपासून SBI WeCare योजनेत गुंतवणूक करू शकणार नाहीत. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत फक्त 30 सप्टेंबर आहे. मात्र, बँका मुदत वाढवून देण्याची शक्यता आहे.
6 / 7
5. IDBI अमृत महोत्सव FD अंतिम मुदत- IDBI ने अमृत महोत्सव FD नावाची 375 आणि 444 दिवसांची नवीन FD योजना सुरू केली आहे. या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 आहे.
7 / 7
6. LIC रिव्हायवल मोहीम- LIC ने जोखीम संरक्षण प्रदान करणे सुरू ठेवण्यासाठी लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वैयक्तिक लॅप्स झालेल्या विम्यासाठी विशेष पुनरुज्जीवन मोहीम राबवली जात आहे.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकInvestmentगुंतवणूकLIC - Life Insurance Corporationएलआयसी