Changing address on Aadhaar Card has become easier than before See the whole process
पहिल्यापेक्षा अधिक सोपं झालं Aadhaar Card वर पत्ता बदलणं; पाहा संपूर्ण प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 4:51 PM1 / 15सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.2 / 15परंतु जर तुमच्या आधार कार्डावरील पत्ता किंवा अन्य कोणती माहिती बदलायची असेल तर तो बदल करणं आता पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपं झालं आहे. याशिवाय या गोष्टी तुम्हाला घरबसल्याही बदलता येणार आहेत. 3 / 15UIDAI नं पत्ता, नाव, जन्मतारीख असे महत्त्वाचे बदल करण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. आता मोबाईल फोनद्वारे घरबसल्या हे काम करणं सोपं झालं आहे. जर तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख यात कोणतेही बदल करायचे असतील तर खालील प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.4 / 15आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर Aadhaar Update Section मध्ये देण्यात आलेल्या 'Request Aadhaar Validation Letter' वर क्लिक करा. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल ओपन होईल.5 / 15त्यानंतर तुमच्या १२ अंकी आधार कार्डाद्वारे लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.6 / 15ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर 'Proceed to Update Address' वर क्लिक करून Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागेल.7 / 15सिक्रेट कोड एन्टर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा अपडेच रिक्वेस्ट नंबर सेव्ह करून ठेवा.8 / 15जर तुम्हाला आधार कार्डावर नावात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला प्रथम ssup.uidai.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंत त्या ठिकाणी असलेल्या प्रोसिड टू अपडेट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.9 / 15त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर १२ अंकी आधार कार्ड क्रमांकानं लॉग इन करा. यानंतर स्क्रिनवर देण्यात आलेल्या कॅप्चा टाका आणि त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.10 / 15ओटीपी एन्टर केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला टाकावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला नावापासून ईमेल आयडीपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.11 / 15त्यानंतर जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तर Name वर क्लिक करा. परंतु यासाठी तुमच्या एकडे एक अन्य आयडीप्रुफ असणं आवश्यक आहे. आयडी प्रुफ म्हणून पॅन कार्ड, लायसन्स, वोटर आयडी, रेशनकार्डाचा वापर करता येऊ शकतो.12 / 15सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल त्यानंतर तो व्हेरिफाय करून सेव्ह चेंजवर क्लिक करा. अशाच प्रकारे तुम्हाला याच वेबसाईटवरून आपली जन्मतारीखही बदलता येईल.13 / 15यासाठीही सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाकून तो व्हेरिफाय करा. त्यानंतर ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून Date Of Birth निवडा. त्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करून घ्या.14 / 15दरम्यान, ही प्रोसेस करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आधार कार्डमध्ये सातत्यानं अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली नाही.15 / 15जन्म तारखेबद्दल नियम अतिशय कडक आहेत. ती तुम्ही केवळ एकदाच अपडेट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications