शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐन उन्हाळ्यात AC, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त; ३ वर्षात प्रथमच दर घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:42 PM

1 / 10
ऐन उन्हाळ्यात फ्रीज, एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली सहसा पाहायला मिळते. परंतु यंदाच्या हंगामात गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती तब्बल ४ हजार रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
2 / 10
रेफ्रिजरेटर आणि एसीसह स्मार्टफोन अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दर घसरल्याने यावेळी ते स्वस्त झाले आहेत. वाहतुकीचा खर्च कमी आणि उरलेला गोदाममधील माल त्वरीत विकता यावा यासाठी किमती ५-१० टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
3 / 10
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार २०२० आणि २०२१ मध्ये स्मार्टफोनची मागणी झपाट्याने वाढली होती. मोबाईल फोन कंपन्यांना गेल्या वर्षी मागणीचा योग्य अंदाज लावता आला नाही आणि त्यामुळे सध्या विक्रीसाठी भरपूर साठा पडून आहे.
4 / 10
जानेवारीपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तू २५ टक्क्यांपर्यंत महाग होत्या. वाढत्या खर्चामुळे इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या वर्षातून दोन-तीन वेळा किमती सुमारे चार टक्क्यांनी वाढवतात. या वर्षी जानेवारीपर्यंत, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कोरोनापूर्वीच्या तुलनेत सरासरी १८-२५% जास्त होत्या.
5 / 10
अॅल्युमिनियम, स्टील आणि पॉलिथिन स्वस्त झाले. ICICI सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, अॅल्युमिनियमच्या किमती फेब्रुवारीमध्ये वर्षभराच्या तुलनेत १६.३० टक्क्यांनी, स्टीलच्या किमती १.३ टक्क्यांनी आणि उच्च घनतेच्या पॉलिथिनच्या ७ टक्क्यांनी कमी झाल्या.
6 / 10
या वस्तूंसोबतच मालवाहतुकीचे दरही खाली आले आहेत. जागतिक मागणीत घट झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून सेमीकंडक्टर चिपच्या किमती घसरत आहेत. कोरोना महामारीच्या वेळेच्या तुलनेत ते दहा पटीने कमी झाले आहे.
7 / 10
काही कंपन्या स्मार्टफोनचे व्हेरिएंट ५ ते १५ टक्के स्वस्तात विकत आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांनी आकर्षिक व्हावं या आधारावर २० हजार रुपयांच्या फोनवर तब्बल तीन हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तरीही मागणीचा अभाव आहे.
8 / 10
फ्रीज ४००० पर्यंत स्वस्त - LG, Samsung आणि Haier सारख्या रेफ्रिजरेटर कंपन्यांनी लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती ४००० रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. एक लाख किमतीच्या फ्रीजची किंमत ७ हजार रुपयांनी कमी झाली आहे.
9 / 10
टाटाच्या व्होल्टासने गेल्या महिन्यात विश्लेषकांना सांगितले की एअर कंडिशनर उद्योग मागणी वाढवण्यासाठी यंदा किमती वाढवत नाही. त्यामुळे AC खरेदी करण्यासाठी ग्राहकांना उन्हाळ्यातही संधी चालून आली आहे.
10 / 10
प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट अॅमेझोन, फ्लिपकार्टवर नेहमी सणानिमित्त विक्रीत जोरदार ऑफर लोकांना देण्यात येते. यावेळीही या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक विक्रीत होळी फेस्टिवलला सूट देण्यात आली होती. टीव्ही आणि इतर गृहोपयोगी वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत सूटची ऑफर होती.