शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 2:45 PM

1 / 7
सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह सुरू असून शनिवारी दसरा सण साजरा केला जाणार आहे. सण-उत्सवात भारतीय लोक सर्वात जास्त खरेदी करतात. कपड्यांपासून वाहनांपर्यंत खेरदीचा नुसता माहोल असतो. सगळीकडे बाजारपेठा तुडूंब भरलेल्या पाहायला मिळतात.
2 / 7
या सणासुदीच्या काळात तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. जर तुम्ही कर्ज घेऊन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आज आपण ५ बँकांच्या कार लोनची तुलना करणार आहोत.
3 / 7
जर तुम्ही यूको बँकेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला ८.४५ ते १०.५५ टक्के व्याज द्यावे लागेल. ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला दरमहा १०,२२६ ते १०,७५९ रुपये EMI भरावा लागेल.
4 / 7
युनियन बँक ऑफ इंडियाकडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला 8.7 ते 10.45 टक्के व्याज द्यावे लागेल. 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला दरमहा 10,307 ते 10,735 रुपये हप्ता भरावा लागेल.
5 / 7
कॅनरा बँक ५ लाख रुपयांचे कर्ज ८.७ ते १२.७ टक्के व्याजाने देते. ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला दरमहा १०,३०७ ते ११,३०० रुपये EMI भरावा लागेल.
6 / 7
बँक ऑफ महाराष्ट्रही वाहन कर्ज सुविधा उपलब्ध करुन देते. या बँकेत ५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास ८.७ ते १३ टक्के व्याज आकारले जाते. ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला दरमहा १०,३०७ ते ११,३७७ रुपयांचा हप्ता द्यावा लागेल.
7 / 7
पंजाब नॅशनल बँक ५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला ८.७५ ते १०.६ टक्के व्याजदर घेते. ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला दरमहा १०,३१९ ते १०,७७२ रुपये EMI भरावा लागेल.
टॅग्स :carकारBanking Sectorबँकिंग क्षेत्रMONEYपैसा