शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुबई, भूतानसह 'या' देशांमध्ये सोने इतकं स्वस्त कसं? भारतात ७५ हजारांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:02 PM

1 / 5
भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगभरात प्रसिद्ध आहे. आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ७५,००० रुपये आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या किमतीत झळाली पाहायला मिळत आहे. पण जगात असे काही देश आहेत जिथे सोन्याची किंमत भारतापेक्षा खूपच कमी आहे. भारतात सोने इतके महाग का आहे? यामागचंही कारण आपण समजून घेऊ.
2 / 5
भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून अनेकजण सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. सोने कितीही महाग होत असले तरी आपल्या एपतीप्रमाणे लोक खरेदी करतातच.
3 / 5
आपला शेजारी देश भूतान हा पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो लोक येथे भेट देण्यासाठी येतात. भूतानमध्ये प्रवासासोबतच सोनेही खूप स्वस्त आहे. भूतानमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ५८,००० रुपये आहे. अशा परिस्थितीत तुम्ही भूतानमधून सोने खरेदी करू शकता. विशेष म्हणजे येथे सोने करमुक्त आहे.
4 / 5
भारताच्या तुलनेत दुबईतही सोने खूप स्वस्त आहे. दुबईत सोने खरेदीसाठी देइरा नावाचे ठिकाण हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. दुबईत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,430 रुपये आहे. इथेही भारताच्या तुलनेत सोन्यावर कमी टॅक्स आहे.
5 / 5
हाँगकाँगमध्येही सोन्याचा भाव भारताच्या तुलनेत कमी आहे. हाँगकाँग हे जगातील सर्वात सक्रिय सोन्याच्या ट्रेंडिंग मार्केटपैकी एक आहे. येथे १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ७०,००० रुपये आहे. इथेही सोने टॅक्स फ्री विकले जाते.
टॅग्स :GoldसोनंDubaiदुबईBhutanभूतानshare marketशेअर बाजार