शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:20 PM

1 / 6
सोने ही अशी वस्तू आहे की, अधिकाधिक लोकांना खरेदी करावी, अशी वाटते. भारतीय महिलांकडे भरपूर सोने असते. भारतातील महिलांकडे इतके सोने आहे की, त्यांनी ते विकल्यास कोणत्याही देशाचा जीडीपी सुधारू शकतो, असे म्हटले जाते. पण सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर येथील दर गगनाला भिडले आहेत.
2 / 6
आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 75 हजार रुपये आहे. भाव कोणताही असो, भारतीय सणांच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. दरम्यान, अशा देशांबद्दल जाणून घ्या, जिथे सोन्याच्या किमती खूप कमी आहेत आणि या देशांमध्ये फिरायला गेला की, तुम्ही नक्कीच सोन्याबाबत चौकशी कराल.
3 / 6
भूतानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. हे ठिकाण लोकांमध्ये फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध झाले आहे. याठिकाणी प्रवास करण्यासाठी एकूण 80 हजार ते एक लाख रुपये खर्च येतो. भूतानमध्ये सोने खरेदीबद्दल बोलायचे झाले तर, जिथे एक वर्षापूर्वी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 43,473.84 रुपये होता, तो आज 58,720 रुपये आहे. ही किंमत वर्षभरात मोठी असली तरी भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेष म्हणजे इथे सोने टॅक्स फ्री आहे.
4 / 6
दुबई हे ठिकाण प्रत्येक क्षेत्रात परफेक्ट आहे, मग ते पर्यटन, पायाभूत सुविधा आणि आधुनिक किंवा प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत दुबई कधीही स्वप्नांच्या यादीतून बाहेर नाही. जर तुम्हाला इथे जायचे असेल, तर येथील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत पाहायला विसरू नका. तसेच, येथील बाकीचे ब्रँड्स जगातील प्रत्येक शॉपिंग स्टोअरला मागे टाकतात. कपड्यांव्यतिरिक्त सोन्याच्या खरेदीसाठी देईरा नावाची जागा आहे, जिथे गोल्ड साउक एरिया सोन्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध मानला जातो. दरम्यान, येथे सोन्याची किंमत 317 AED प्रति ग्रॅम म्हणजेच 72,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
5 / 6
फार कमी लोकांना माहीत असेल की, थायलंडमध्येही अगदी वाजवी दरात सोने मिळते. जर तुम्ही येथे भेट द्यायला जात असाल तर यापेक्षा चांगले काय असू शकते, तुम्ही येथून कमी किमतीत सोने खरेदी करू शकता. थायलंड हे बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्समध्ये म्हटले जाते. याठिकाणी 70 ते 1 लाख रुपयांत आरामात पर्यटन करता येईल. दरम्यान, येथे तुम्हाला कमी फरकाने सोने मिळेल आणि दुकानदारही तुम्हाला चांगली व्हरायटी दाखवतील. थायलंडमधील चायना टाउनमध्ये यावोरात रोड हे सोने खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
6 / 6
हाँगकाँगमध्ये कपड्यांपासून ते विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंपर्यंत बरेच काही खरेदीदारांना मिळू शकते. हाँगकाँग सुद्धा स्वस्त सोने मिळू शकते. दरम्यान, हा देश जगातील सर्वात सक्रिय सोन्याच्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये येतो. येथे सोन्याची किंमत 70,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
टॅग्स :businessव्यवसायGoldसोनंTravel Tipsट्रॅव्हल टिप्स