How To Test Gold Purity At Home: तुमच्याकडचे सोने अस्सल आहे हे कसे चेक कराल? या 5 सोप्या टेस्ट ठरवतील शुद्धता By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 6:58 PM
1 / 11 Types Of Gold In India: आपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना बनविले जाते. आपल्याला 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने तयार करून मिळतात. पण हा जो चौथा प्रकार आहे, तो फसवणुकीचा असतो. 2 / 11 तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे. (Which type of gold you should buy) 3 / 11 आता 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये काय फरक आहे ते आधी पाहू. (Difference Between 24K, 22K and 18K gold) 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये 99.99 शुद्धता असते. यापेक्षा शुद्ध सोने असत नाही. याची विट बनविली जाते. गुंतवणुकीसाठी हे सोने योग्य आहे. 4 / 11 22 कॅरेटच्या सोन्यापासून दागिने बनविले जातात. हे सोने 91.67 टक्के शुद्ध असते. म्हणजे उरलेल्या 8.33 टक्क्यांमध्ये अन्य धातू मिसळले जातात. किंवा 22 कॅरेटसोन्यामध्ये 22 भाग सोने असते, 2 भाग चांदी, तांबे व झिंकसारखे धातू असतात. याला 916 गोल्ड या नावेदेखील ओळखले जाते. 5 / 11 18 कॅरेट सोन्यामध्येही दागिने बनविले जातात. यामध्ये 18 भाग सोने आणि उरलेल्या 6 भागात धातू मिसळलेले असतात. हे सोने 75 टक्के शुद्ध असते. 25 टक्के धातू असतात. आता सोनारांनी यामध्ये 23 कॅरेट, 16 कॅरेट, 14 कॅरेट, 10 कॅरेट सारखे प्रकार काढले आहेत. यामध्येही अशाच 24- सोन्याच्या दागिन्यांचे कॅरेट अशा प्रमाणात मिक्सिंग असते. 6 / 11 हा झाला सोन्याचा प्रकार. आता आपण सोन्याची शुद्धता कशी तपासतात ते पाहुयात. सोन्याची शुद्धता तपासण्याचे पाच प्रकार आहेत, काही घरच्या घरी देखील करता येणारे आहेत. चला पाहुया हे सोन्याची शुद्घता तपासण्याचे प्रकार... 7 / 11 सोने खरेदी करताना तुम्हाला आता सर्वप्रथम हॉलमार्क पाहणे गरजेचे आहे. हॉलमार्क सर्टिफिकेशन म्हणजे सोने खरे असल्याची पावती. हे सर्टिफिकेट ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून दिले जाते. प्रसिद्ध ब्रँडमध्ये तुम्हाला सोने हॉलमार्कचेच मिळेल. परंतू स्थानिक पातळीवर हॉलमार्क नसलेले सोने देखील मिळू शकते. यामुळे हॉलमार्क नसेल तर खऱ्या खोट्या सोन्याची ओळख तुम्हाला पटवावी लागणार आहे. 8 / 11 सोन्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतो. म्हणजेच लोहचुंबक जवळ नेल्यास सोने त्याकडे ओढले जात नाही. जर तुमच्याकडील सोने किंवा दागिने चुंबकाकडे जात असतील तर ते सोने बनावट असल्याचे समजून जा. जर ते सोने चुंबकाकडे ओढले गेले नाही तर पहिली टेस्ट पास झाल्याचे समजावे. सोन्याला कधी जंग लागत नाही. जंग दिसली तर ते सोने नकली असते. 9 / 11 सोन्याची एक खास बाब म्हणजे ते हार्ड मेटल आहे. यामुळे त्याचे फ्लोटिंग म्हणजेच तरंगण्याची टेस्ट घेतली जाऊ शकते. यासाठी एका बादलीमध्ये थोडे पाणी घ्यावे, त्यानंतर तुमचे दागिने त्यात टाकावेत. जर दागिने बुडाले तर फ्लोटिंग टेस्ट पास झाली. पण जर ते सोने तरंगले तर समजून जावे की ते नकली आहे. 10 / 11 सोन्यावर नायट्रिक अॅसिडचा कोणताही परिणाम होत नाही. जर त्यामध्ये कॉपर, झिंक, स्टर्लिंग सिल्व्हर किंवा अन्य काही असेल तर अॅसिडचा परिणाम दिसतो. टेस्ट करण्यासाठी दागिन्याला थोडे स्क्रॅच करावे. त्यावर नायट्रिक अॅसिड टाकावे. जर कोणता परिणाम दिसला तर ते सोने खोटे आहे, नाही दिसला तर अॅसिड टेस्ट पास झाले व सोने खरे आहे हे समजावे. ही टेस्ट करताना सावधानतेने करावी, अॅसिड असल्याने तुम्हाला जखम होऊ शकते. 11 / 11 जवळपास सर्वांच्या किचनमध्ये किंवा आजुबाजुच्या किराणा दुकानात व्हिनेगार आरामात उपलब्ध असते. सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगारचे दोन-चार थेंब टाकले तर ते खरे आहे की खोटे ते एका झटक्यात दिसणार आहे. खरे सोने असेल तर तुम्हाला त्यावर पाणी पडल्यासारखेच दिसेल. परंतू जर खोटे सोने असेल तर तुम्हाला सोन्याचा रंग बदललेला दिसेल. आणखी वाचा