China property slump casts shadow on global prospects: Fitch ratings
चीन स्वत:ही बुडतोय पण भारतासह संपूर्ण जगाला टेन्शन देतोय; चिंताजनक रिपोर्ट जारी By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 4:13 PM1 / 10जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये सध्या बिकट परिस्थिती आहे. चीनच्या या दुर्दशेचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 2 / 10जागतिक रेटिंग एजन्सी फिचच्या(Fitch) मते, चीनच्या मालमत्ता बाजारातील घसरणीचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. 3 / 10चीनच्या अर्थव्यवस्थेत हाऊसिंग क्षेत्राचा वाटा १२ टक्के आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील संकट चीनची अर्थव्यवस्था बुडवू शकते, असे मानले जाते. यावर्षी देशातील नवीन घरांच्या विक्रीत २० टक्क्यांनी घट होऊ शकते. 4 / 10चीनच्या निर्यातीत सातत्याने घट होत आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे आणि परदेशी कंपन्या स्थलांतरीत होत आहेत. अशा वातावरणात लोक पैसे खर्च करण्याऐवजी बचत करण्यात व्यस्त आहेत.5 / 10फिचने २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ०.१ टक्क्यांनी वाढवून २.५ टक्के केला आहे. पण चीनमधील रिअल इस्टेट संकटाचा जगावर मोठा परिणाम होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे. 'चीनचे हाऊसिंग मार्केट पुन्हा रुळावर येण्याची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. 6 / 10चीनने गृहनिर्माण क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून तेथील अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा १२ टक्के आहे. रिअल इस्टेट संकटाचा परिणाम देशाच्या व्यापक अर्थव्यवस्थेवर दिसून येतो. चीनने आतापर्यंत स्वीकारलेल्या धोरणांचा काही परिणाम झालेला दिसत नाही. देशाच्या निर्यातीत सातत्याने घसरण होत आहे असं फिच संस्थेनं म्हटलं आहे. 7 / 10दरम्यान, फिच रेटिंग्सने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज ६.३ टक्के तसाच ठेवला आहे. कठोर आर्थिक धोरण आणि निर्यातीत कमजोरी असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेत लवचिकता आहे. अल निनोच्या धोक्यामुळे वर्षअखेरीच्या महागाईचा अंदाज वाढवण्यात आला आहे. 8 / 10चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत मजबूत सेवा क्षेत्रातील कार्यवाही आणि मजबूत मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्था ७.८ टक्के वाढली. अहवालानुसार, 'शिस्तप्रिय आर्थिक धोरण आणि निर्यातीत घट असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेने वाढीच्या बाबतीत इतर देशांना मागे टाकले आहे9 / 10ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुकच्या सप्टेंबर अपडेटमध्ये फिचने म्हटले आहे की, उच्च वारंवारता निर्देशक सूचित करतात की जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतातील महागाई वाढ मंद होण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीमुळे येत्या काही महिन्यांत महागाईत तात्पुरती वाढ होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. 10 / 10फिचने २०२३ मध्ये महागाई दर ५.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील अंदाजानुसार पाच टक्के होता. एजन्सीचे म्हणणे आहे की या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीपर्यंत पॉलिसी दर ६.५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications