शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंद झालेली एलआयसीची विमा पॉलिसी आता पुन्हा सुरू करता येणार, अशी आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 7:27 PM

1 / 8
आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि संकटकाळाता आधार मिळावा यासाठी अनेकांकडून गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून एलआयसीमधील गुंतवणुकीला अजूनही प्राधान्य दिलं जातं.
2 / 8
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यात बहुतांश उद्योग व्यवहार बंद असल्याने अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांना आपल्या विम्याचे नियमित हप्ते भरणे शक्य झालेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या विमा पॉलिसी बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
3 / 8
तसेच गेल्या काही वर्षांतील मंदीमुळेही अनेकांना विमा पॉलिसीचे हप्ते भरता न आल्याने त्यांच्या पॉलिसी बंद झाल्या आहेत. मात्र आता अशा बंद झालेल्या विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी एलआयसीने दिली आहे.
4 / 8
भारतीय जीवन बिमा निगम (एलआयसी) ने १० ऑगस्टपासून एक विशेष अभियान सुरू केले आहे. हे अभियान ९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत बंद झालेल्या वैयक्तिक विमा पॉलिसी सुरू करता येणार आहेत. मात्र बंद झालेल्या ग्रुप पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार नाहीत.
5 / 8
पीटीआयने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार एलआयसीने स्पेशल रिव्हायव्हल कॅम्पेनअंतर्गत काही खास योजनांच्या विमा पॉलिसी सुरू करता येतील असे सांगितले आहे. मात्र यासाठी प्रीमियम भरणे बंद केल्याची तारीख पाच वर्षांहून अधिकची असता कामा नये.
6 / 8
म्हणजेच पाच वर्षांपूर्वीपर्यंत बंद पडलेल्याच पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहेत. मात्र त्यापेक्षा आधी बंद झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार नाहीत. तसेच या पॉलिसी सुरू करताना विमाधारकांना विलंब आकारामध्ये २० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
7 / 8
जेव्हा विमा घेणारी व्यक्ती सातत्याने अनेकवेळा प्रीमियमचा हप्ता वेळेवर भरण्यास असमर्थ ठरते तेव्हा पॉलिसी बंद होते. त्यामुळे पॉलिसीच्या माध्यमातून मिळणारे फायदे मिळवण्यासाठी पॉलिसी सुरू राहणे आवश्यक असते.
8 / 8
दरम्यान, एलआयसीचा न्यू बिझनेस प्रीमियम २०१९-२० या वर्षासाठी २५.२ टक्क्यांनी वाढून १ लाख ७७ हजार ९७७ कोटींपर्यंत पोहोचला आहे. तसेच याची बाजारातील भागीदारी अजूनही एकूण प्रीमियमच्या ६८.७४ टक्के आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या