शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानींचा मेगा प्लान! रिलायन्स आणतेय Jio चा IPO; किती कोटी उभारणार? पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 11:40 AM

1 / 13
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावलेला पाहायला मिळाला. यामुळे अन्य गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागल्याचे दिसत आहे.
2 / 13
असे असले तरी शेअर बाजारात IPO चा ओघ सुरूच आहे. यातच आता मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी मेगा प्लान आखत असल्याचे बोलले जात आहे.
3 / 13
शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर आशियातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी देखील स्वार होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी रिलायन्स Jio चा IPO याच वर्षी शेअर मार्केटमध्ये येईल.
4 / 13
या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होणाऱ्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात मजबूत दावेदारी सादर करण्यासाठी मुकेश अंबानींकडून रिलायन्स Jio च्या IPO ची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज सीएलएसए या संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
5 / 13
ऐन लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानी यांनी फेसबुक, गुगल यासारख्या जगभरातील बड्या गुंतवणूकदारांना जिओमधील ३३ टक्के हिस्सा विक्री केला होता. यातून कंपनीने १.५२ लाख कोटी उभारले होते.याच Jio चा काही हिस्सा आता सामान्यांना गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
6 / 13
मात्र IPO बाबत रिलायन्स Jio किंवा रिलायन्स समूहाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. चालू आर्थिक वर्ष २०२२ मध्ये सरकारकडून 5G स्पेक्ट्रम लिलाव घेतला जाण्याची शक्यता आहे. या लिलावात यशस्वी होणाऱ्या कंपनीसाठी संधीचे महाद्वार खुले होणार आहे.
7 / 13
त्यामुळे प्रत्येक दूरसंचार कंपनी लिलावासाठी आवश्यक निधीची तजवीज करण्यामध्ये मग्न असल्याचे सीएलएसएने आपल्या अहवालात म्हटले आहे. दूरसंचार कंपन्यांमधील दर युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
8 / 13
या संस्थेच्या अंदाजानुसार, Jio चे व्यावसायिक मूल्य जवळपास १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७.४० लाख कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. यात जिओचे मोबाईल बिझनेसचे मूल्यांकन ९९ अब्ज डॉलर असून ब्रॉडबँड सेवेचे जिओ फायबरचे व्यावसायिक मूल्य ५ अब्ज डॉलर आहे. जिओचे देशभरात ४२ कोटी ग्राहक आहेत.
9 / 13
मागील काही दिवसात सर्वच कंपन्यांनी मोबाइल दरात वाढ केली आहे. तर केंद्र सरकारने देखील दूरसंचार क्षेत्रात आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडी आयपीओ आणण्यासाठी पोषक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे रिलायन्स Jio चा IPO याच वर्षात भांडवली बाजारात दाखल होईल, असा दावा सीएलएसएने केला आहे.
10 / 13
दरम्यान, आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवत असताना मुकेश अंबानी यांनी निवृत्तीचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. देशातील बलाढ्य अशा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे स्पष्ट संकेत RILचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिले.
11 / 13
मुकेश अंबानी आता ६४ वर्षांचे आहेत. सन २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी RILचे अध्यक्ष झाले. तिथून त्यांनी केलेली प्रगती साऱ्या देशाने पाहिली. त्यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत.
12 / 13
मुकेश अंबानी यांची तीनही मुले RILच्या दूरसंचार, किरकोळ आणि ऊर्जा व्यवसायाचे काम पाहतात. मात्र, यापैकी RILच्या संचालक मंडळावर कोणीही नाही. ते कंपनीच्या प्रमुख शाखांमध्ये संचालक म्हणून काम पाहतात.
13 / 13
सूचीबद्ध कंपन्यांमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदे विभाजित करण्यासाठी सेबीने मुदतवाढ दिली आहे. आता मुकेश अंबानी या संधीचा फायदा घेऊ इच्छितात, असे सांगितले जात आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी जगभरातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले असून, त्यांचे नेटवर्थ ८५ अब्ज डॉलर आहे.
टॅग्स :Relianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानीIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार