शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CNG price: आता सीएनजीही धूर काढू लागला!; महाराष्ट्रानं स्वस्त केला, केंद्रानं दुपटीनं वाढवला; PNG ही महागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 4:15 PM

1 / 6
CNG PNG price Hike : महाराष्ट्र सरकारने १ एप्रिलपासून राज्यातील सीएनजी (CNG) आणि पीएनजीसारख्या (PNG) सारख्या ग्रीन फ्युअलवरील व्हॅटच्या दरात कपात केली होती.
2 / 6
मात्र एप्रिल महिन्यातच त्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यानंतर नुकतीच मुंबईत सीएनजीच्या दरात किलोमागे ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर पीएनजीही महाग झाला आहे.
3 / 6
मुंबईत सीएनजीच्या वाढलेल्या किंमती मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहेत. शहरात पुरवठा करणाऱ्या महानगर गॅल लिमिटेडनंही पीएनजीच्या दरात साडेचार रुपयांची वाढ केली आहे. यानंतर बुधवारी सीएनजीचे दर ७२ रुपये प्रति किलो आणि पीएनजीचे दर ४५.५० रुपये प्रति युनिट झाले आहेत.
4 / 6
महानगर गॅसनं यापूर्वी ६ एप्रिल रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी सीएनजीच्या दरात ७ रुपये प्रति किलो आणि पीएनजीच्या दरात पाच रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात मुंबईमध्ये सीएनजी १२ रुपये प्रति किलो आणि पीएनजी साडेनऊ रुपये प्रति युनिटनं महागला आहे.
5 / 6
महानगर गॅस लिमिटेडने केंद्राने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे किंमती वाढल्या आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की केंद्र सरकारनं त्यांच्या किमती ११० टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
6 / 6
किमती कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅटच्या दरात कपात केली होती. ते १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते. यानंतर सीएनजीच्या किमतीत प्रति किलो ६ रुपये आणि पीएनजीच्या दरात ३.५० रुपये प्रति युनिटची कपात करण्यात आली.
टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार