common mistakes in filing income tax return people do know how to file itr correctly date 2023
ITR Filing : छोट्या-छोट्या चुकांमुळे होऊ शकते मोठी अडचण; 'या' 6 गोष्टी लक्षात ठेवा अन् भरा टॅक्स रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 3:53 PM1 / 8नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न (ITR filing) फाइल करण्याची अंतिम तारीख (ITR Filing Last date) 31 जुलै आहे. आयटीआर फाइल हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. हे काम अतिशय काळजीपूर्वक आणि सावधपणे केले पाहिजे. आयटीआर भरताना झालेली छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे आयटीआर वेळेवर आणि काळजीपूर्वक भरला पाहिजे.2 / 8ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक खात्याचे डिटेल्स, पुराव्यासह गुंतवणूकीचे डिटेल्स आणि इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि तुमचा ई-मेल आयडी देखील आयकर विभागाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 3 / 8वेगवेगळ्या करदात्यांसाठी आयटीआर फॉर्म वेगवेगळा असतो. त्यामुळे आयटीआर भरताना योग्य फॉर्म निवडला पाहिजे. चुकीचा फॉर्म भरल्याने आयटीआर रद्द होऊ शकतो.4 / 8आयटीआर फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक डिटेल्स योग्यरित्या भरले पाहिजे. नाव, पॅन नंबर, ईमेल आयडी आणि फोन नंबर योग्यरित्या प्रविष्ट करा. यापैकी कोणतीही माहिती चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केली असल्यास, आयटीआर प्रक्रिया करण्यास वेळ लागेल.5 / 8आयटीआर भरताना तुम्ही ज्या स्रोतातून कमाई केली आहे. त्या प्रत्येक स्रोताची माहिती द्यावी. जर तुम्ही कोणत्याही स्रोतातून उत्पन्न जाहीर केले नाही, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.6 / 8आयटीआर भरण्यापूर्वी सर्व डिडेक्शनची माहिती घ्या. मेडिकल इन्शुरन्स, एज्युकेशन लोन यासह अनेक ठिकाणी गुंतवणुकीवर तुम्हाला कर सूट मिळते. आयटीआर भरताना त्या सर्वांचा उल्लेख करा. असे न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होईल.7 / 8जोपर्यंत तुम्ही आयटीआर व्हेरिफाय करत नाही, तोपर्यंत ते वैध नाही. तुम्ही तुमच्या आयकर ई-फायलिंग पोर्टलद्वारे तुमच्या कर रिटर्नची ई-व्हेरिफाय करू शकता किंवा तुम्ही ते सीपीसी-बंगळुरूला पाठवूनही व्हेरिफाय करू शकता.8 / 8फॉर्म 26AS किंवा टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट तुमच्या उत्पन्नातून कापलेल्या TDS च्या पेमेंटची सर्व माहिती देते. तुमच्या कर परताव्यावर दावा करण्यापूर्वी हे तपासण्याची खात्री करा. हे तुम्हाला कर गणनेतील कोणत्याही प्रकारच्या चुकांपासून वाचवेल जेणेकरून तुम्ही योग्य कर रिटर्न भरण्यास सक्षम व्हाल. आणखी वाचा Subscribe to Notifications