शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 2:03 PM

1 / 8
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे परंतु इथलं प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये आपण आजही अनेक देशांमध्ये पिछाडीवर आहोत. यूरोपातील सर्वाधिक गरीब देशांच्या तुलनेतही भारत कुठेही नाही हे समोर आले आहे.
2 / 8
इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) आणि जागतिक बँकेच्या मते, मोल्दोव्हा हा युरोपमधील सर्वात गरीब देश आहे. परंतु या देशाचा प्रतिव्यक्ती जीडीपी भारतापेक्षा खूप जास्त आहे. भारतात दरडोई जीडीपी सुमारे २७०० डॉलर आहे, तर मोल्दोव्हामध्ये ते ४५०० डॉलर इतरा आहे.
3 / 8
मोल्दोव्हा नंतर युक्रेन हा युरोपमधील सर्वात गरीब देश आहे. या युद्धग्रस्त देशाचा दरडोई जीडीपी देखील ४५०० डॉलर आहे. भारताचा दरडोई जीडीपी २०२९ मध्ये ४ हजार २८१ डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
4 / 8
युरोपातील गरीब देशांच्या यादीत कोसोवो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाचा दरडोई जीडीपी ४७०० डॉलर आहे. आर्मेनियामध्ये ते ५३०० डॉलर आणि अल्बेनियामध्ये ते ५५०० डॉलर आहे. उत्तर मॅसेडोनियामध्ये दरडोई जीडीपी ६१०० डॉलर, जॉर्जियामध्ये ६२०० डॉलर, बोस्निया-हर्जेगोव्हिनामध्ये ६३०० डॉलर आहे.
5 / 8
सर्बियामध्ये ७५०० डॉलर, मॉन्टेनेग्रोमध्ये ८००० डॉलर, बेलारूसमध्ये ८३०० डॉलर, अझरबैजानमध्ये ८५०० डॉलर आणि बुल्गारियामध्ये ९७०० डॉलर आहे. रोमानिया, तुर्की, रशिया, ग्रीस, हंगेरी, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियामध्ये ते १०००० ते २०००० डॉलर दरम्यान जीडीपी आहे.
6 / 8
यूरोपातील सर्वाधिक श्रीमंत देशांची यादी पाहिली तर वेटिकन सिटी पहिल्या नंबरवर आहे. याठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा जीडीपी ६३ हजार डॉलर आहे. त्यानंतर सॅन मरीनो नंबर येतो. या देशात जीडीपी प्रति कॅपिटा ६१२०० डॉलर एवढा आहे.
7 / 8
अंडोरा ५९५०० डॉलर, मोनाको ५७८०० डॉलर, लिकटेंस्टिन ५६००० डॉलर, टॉप ५ देशांमध्ये समाविष्ट आहेत. स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, आइसलँड, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, स्वीडन, आयर्लंड, नेदरलँड आणि ऑस्ट्रियामध्ये ते ४० हजार डॉलर पेक्षा जास्त आहे. ब्रिटनचा जीडीपी दरडोई ३८००० जीडीपी आहे.
8 / 8
जीडीपी प्रति कॅपिटा म्हणजे, यातून देशातील प्रति व्यक्तीचं सरासरी उत्पन्न किती आहे हे दर्शवते. दरडोई जीडीपी हे एक मोजमाप आहे जे देशाची आर्थिक ताकद आणि वाढ निश्चित करण्यात मदत करते.