शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

31 मार्चपूर्वी उरकून घ्या 'ही' पाच महत्त्वाची कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:12 AM

1 / 6
नवी दिल्ली : येत्या ३१ मार्च रोजी चालू वित्त वर्ष संपेल. त्यानंतर सर्वजण नव्या आर्थिक वर्षात प्रवेश करतील. परंतु नव्या वर्षात प्रवेश करण्याआधी काही कामे या मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो तसेच इतरही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टीडीएस फायलिंग आणि जीएसटी समाधान योजनेसाठी अर्ज करणे याचा त्यात समावेश आहे.
2 / 6
१.५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी वित्त वर्ष २०२४-२५ करिता जीएसटी कंपोजिशन स्कीम म्हणजेच जीएसटी समाधान योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. यासाठी व्यावसायिकांनी सीएमपी-०२ अर्ज भरणे आवश्यक आहे.
3 / 6
३१ मार्चपूर्वी फास्टॅग केवायसी अद्ययावत न केल्यास १ एप्रिल २०२४ पासून तुमचे फास्टॅग खाते अवैध होईल. नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाइटवर अथवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलवर केवायसी पूर्तता करता येईल.
4 / 6
वित्त वर्ष २०२३-२४ साठी तुम्ही जुन्या आयकर योजनेत आयटीआर दाखल करणार असाल, तर कर सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी ३१ मार्चपूर्वी आवश्यक गुंतवणूक करा. याद्वारे तुम्हाला १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळू शकते.
5 / 6
सार्वजनिक भविष्य निधी व सुकन्या समृद्धीसह अन्य योजनांत गुंतवणूक असेल तर ३१ मार्चपर्यंत किमान गुंतवणूक अटीची पूर्तता करावी लागेल. पीपीएफमध्ये किमान ५००, तर सुकन्या योजनेत किमान २५० रुपये गुंतवणे आवश्यक आहे. हे न केल्यास तुम्हाला दंड लागू शकतो.
6 / 6
जानेवारी २०२४ साठी वेगवेगळ्या कलमाधारे घेतलेल्या कर सवलतीसाठी मार्चमध्ये टीडीएस फायलिंग सर्टिफिकेट दाखवणे आवश्यक आहे. यात ३० मार्चपूर्वी चालान स्टेटमेंट फाइल करावे लागेल.
टॅग्स :Taxकरbusinessव्यवसाय