शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' कामे 31 मार्चपूर्वी उरकून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 8:31 AM

1 / 8
नवी दिल्ली : ३१ मार्च २०२३ रोजी चालू वित्त वर्ष (२०२२-२३) संपत आहे. १ एप्रिल २०२३ पासून नवे वित्त वर्ष सुरू होईल. चालू वित्त वर्षातील अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स) जमा करण्यासह एकूण ५ कामे ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे.
2 / 8
ऑनलाइन गेमिंग, गॅम्बलिंग, बेटिंग, फँट्सी स्पोर्ट्स यात जिंकलेल्या रकमेवर १ एप्रिलपासून सरसकट टीडीएस कपात होईल. मार्केट लिंक्ड डिंबेचरच्या व्याज भरण्यावर मिळणारी टीडीएस कपातीतील सवलत संपेल. ईपीएफ काढताना पॅन क्रमांक न दिल्यास २० टक्के टीडीएस लागणार आहे. एनआरआय आणि विदेशी कंपन्यांना केलेल्या अदायगीवर २० टक्के टीडीएस लागणार आहे. विदेशी समभागांतील गुंतवणूक आणि रेमिटन्स यावरील टीडीएस ५ टक्क्यांवरून २० टक्के होईल.
3 / 8
३१ मार्चनंतर ४ अंकी हॉलमार्क असलेले दागिने विकता येणार नाही. १ एप्रिल २०२३ पासून केवळ ६ अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच विकता येतील.
4 / 8
३१ मार्चपूर्वी आपले पॅन कार्ड आधारशी जोडून घ्या. अन्यथा पॅन कार्ड अकार्यरत (डिॲक्टिव्हेट) होईल. ३१ मार्चनंतर जोडणी केल्यास १ हजार रुपयांचा दंड लागेल.
5 / 8
गुंतवणुकीवरील कर सवलतीसाठी वेतनधारक कर्मचाऱ्यांनी कंपनीला फॉर्म १२ बीबी ३१ मार्चपूर्वी भरून द्यावा. यात एचआरए, एलटीसी आणि गृहकर्ज यांची माहिती दिली जाऊ शकते.
6 / 8
आढावा वर्ष २०२०-२१ साठी सुधारित आयकर विवरणपत्र (आयटीआर) ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरले नसेल अथवा त्यात त्रुटी असतील, तर सुधारित आयटीआर भरा.
7 / 8
१० हजार रुपयांपेक्षा अधिक कर देयता असलेल्या करदात्यांना वर्षातून ४ वेळा आगाऊ कर भरावा लागतो. आगाऊ कराचा चौथा हप्ता ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे.
8 / 8
वित्त वर्ष २०२२-२३ साठी जुन्या कर व्यवस्थेत कर सवलत प्राप्त करण्यासाठी ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पीपीएफ, ईएलएसएस, युलिप, एनपीएस इत्यादी योजनांत ही गुंतवणूक केली जाऊ शकते.
टॅग्स :businessव्यवसायTaxकर