शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा ही कामे, अन्यथा बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 10:09 AM

1 / 5
चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च सुरू आहे. या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ती न केल्यास माेठा भुर्दंड बसू शकताे. त्यात आधार-पॅन जाेडण्यासह कर वाचविण्यासाठी हाेणाऱ्या गुंतवणूकीचा समावेश आहे.
2 / 5
आधार-पॅन जाेडणे : आधार आणि पॅन हे जाेडणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे. मात्र, यंदा ३१ मार्च २०२३ ही अखेरची मुदत असून त्यानंतर पॅन निष्क्रीय करण्यात येईल. ३० जून २०२२ पासून आधारला पॅन जाेडण्यासाठी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे.
3 / 5
करबचतीसाठी गुंतवणूक : २०२२-२३ या आर्थिक वर्षात करबचत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी याेजना, ईएलएसएस, जीवन वीमा इत्यादींमध्ये गुंतवणूक करून ८०सी अंतर्गत करबचत करू शकता.
4 / 5
पीएम वय वंदना याेजना : ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना याेजनेत गुंतवणूक करण्यासाठी हा पर्याय आहे. याेजनेला ३१ मार्च २०२३ नंतर मुदतवाढ देण्याबाबत सरकारने काेणतेही नाेटीफिकेशन जारी केलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठांना ही अखेरची संधी आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही पेन्शन याेजना आहे.
5 / 5
म्युच्युअल फंडमध्ये नामांकन : म्युच्युअल फंडमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड पाेर्टफाेलिओमध्ये नामांकन करणे आवश्यक आहे. अनक जण याकडे दुर्लक्ष करतात. सर्व फंड हाउसेसनी यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर खाते गाेठविले जाउ शकते.
टॅग्स :MONEYपैसाInvestmentगुंतवणूकAdhar Cardआधार कार्ड