शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mankind Pharma IPO: नफा कमवण्याची सुवर्णसंधी, कंडोम तयार करणारी कंपनी आणणार फार्मातील मोठा आयपीओ; पाहा योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 4:40 PM

1 / 6
Mankind Pharma IPO: सध्या अनेक कंपन्या आपला आयपीओ (IPO) घेऊन येत आहेत. यातच आता आणखी एका मोठ्या कंपनीचं नाव जोडलं जाऊ शकतं. मॅनफोर्स कंडोमची उत्पादक कंपनी मॅनकाइंड फार्मा (Manforce Pharma) ही आयपीओ (IPO) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
2 / 6
दरम्यान, भारतातील सर्वात मोठी नॉन लिस्टेड फार्मास्युटिकल फर्म्सपैकी एक क्रिसकॅपिटल समर्थिक मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) २०२२ मध्ये मेगा आयपीओ आणण्याच्या तयारी आहे. यासाठीकंपनीनं गुंतवणूकदार बँकर्स सोबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे.
3 / 6
सर्वाधिक विक्री होणारा कंडोम ब्रान्ड मॅनफोर्स कंडोम. कलोरी १ आणि प्रेगा न्यूज निर्माता कंपनी मॅनकाइंड फार्मा यावर्षी मेगा आयपीओ (Mega IPO) आणण्याची शक्यता आहे. मनीकंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
4 / 6
परंतु सध्या हा सुरूवातीचा टप्पा आहे. मॅनकाइंड फार्माचं व्हॅल्युएशन संभाव्यत: ८ ते १० बिलियन डॉलर्सच्या मध्ये असू शकतं. कंपनीच्या लिस्टिंगचा उद्देश त्या गुंतवणूकदारांना आंशिक रिटर्न देणं जे ठराविक कालावधीक रिटर्नच्या शोधात आहेत.
5 / 6
तज्ञांच्या मते, ही एक कॅश रिच फर्म आहे आणि IPO मध्ये मुख्यतः OFS किंवा गुंतवणूकदारांद्वारे विक्री कंपोनंट ऑफर करण्याची शक्यता आहे. ख्रिस कॅपिटल व्यतिरिक्त, या कंपनीला कॅपिटल इंटरनॅशनल आणि सिंगापूरच्या जीआयसीचा पाठिंबा आहे.
6 / 6
२०१५ मध्ये कॅपिटल इंटरनॅशनलनं २० कोटी डॉलर्समध्ये क्रिसकॅपिटल फार्मामध्ये ११ टक्क्यांची भागीदारी खरेदी केली होती. एप्रिल २०१८ मध्ये क्रिस कॅपिटलच्या नेतृत्वातील कन्सोर्टिअमनं आश्चर्यकारक पुनरागमन केलं आणि जवळपास ३५० मिलियन डॉलर्समध्ये पुन्हा १० टक्के भागीदारी खरेदी केली.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसाय