शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Warren Buffett चा कॉपीकॅट! हुबेहूब नक्कल करून अब्जाधीश बनला हा एनआरआय इन्व्हेस्टर; जाणून घ्या कोण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 3:53 PM

1 / 12
जेव्हा अख्खी दुनिया ओरिजिनल आयडियांच्या मागे धावत होती, तेव्हा एका एनआरआय इन्व्हेस्टरने एकदम उलटी झेप घेतली होती. त्यांनी जगविख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफेंच्या निर्णयांची हुबेहुब नक्कल केली आणि त्यांच्याएवढा नाही परंतू त्यांच्यासारखे अब्जाधीश बनले. (mohnish pabrai cloning warren buffett and became billionaire successful investor.)
2 / 12
या एनआरआय गुंतवणूकदाराचे नाव मोहनीश पबराय (mohanish pabrai) असे आहे. मोहनीश यांनी 1995 मध्ये शेअर बाजारात पैसे गुंतविण्यास सुरुवात केली.
3 / 12
पाच वर्षांत त्यांनी 10 लाख डॉलरचे 1 कोटी डॉलर कमविले. त्यांनी बफे यांच्या पार्टनरशिप मॉडेलसारखेच त्यांचा पबराय इन्व्हेस्टमेंट फंड बनविला. या त्यांच्या फंडने 2000 ते 2018 दरम्यान 1204 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला.
4 / 12
विलियम ग्रीनने आपल्या नुकत्याच आलेल्या Richer, Wiser, Happier या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. पबराय हे आमच्या काळातील प्रसिद्ध गुंतवणूकदार ठरले. त्यांनी वॉरेन बफे आणि त्यांचा पॉलीमैथिक पार्टनर चार्ली मुंगेर (Charlie Munger) यांची कॉपी करून हे शिखर गाठले आहे.
5 / 12
ग्रीनने जगभरातील 40 हून अधिक सुपर इन्व्हेस्टरांची यशोगाथा नोंदविली आहे. मोहनीश पबराय हे सध्या 57 वर्षांचे आहेत. चला जाणून घेऊया या कॉपीकॅट एनआरआयबद्दल...
6 / 12
मोहनीश पबराय हे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. ते तिथेच स्थायिक झाले. जेव्हा लोक स्वत:चे असे काहीतरी रॉकेट सायन्स शोधण्याचा किंवा आयडिया प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मोहनीश यांनी बफेंचा रस्ता पकडला.
7 / 12
ते स्वत:च सांगतात, ''मी अतिशय निर्लज्जपणे कॉपी केली. माझ्या आयुष्यातील सारे काही कॉपीच केलेले आहे. माझ्याकडे माझा असा कोणताच मूळ विचार नाहीय.''
8 / 12
1994 मध्ये मोहनीश जेव्हा हिथ्रोच्या विमानतळावर विमानाची वाट पाहत होते, तेव्हा त्यांच्या हाती पीटर लिंच यांचे One Up on Wall Street हे पुस्तक हाती लागले. यामध्ये Oracle of Omaha ने 44 वर्षांहून अधिक काळ वर्षाला 31 टक्के परतावा दिला तेव्हा त्यांच्या डोक्यातील ट्यूब पेटली.
9 / 12
त्यांनी वॉरेन बफे यांच्यावरील अनेक पुस्तके वाचली. त्यांनी कुठे, कधी, कशी गुंतवणूक केली; तेव्हा कोणती परिस्थिती होती याचा अभ्यास केला.
10 / 12
एवढ्यावरच मोहनीश थांबले नाहीत, त्यांनी बफे यांनी बर्कशायरच्या शेअरहोल्डरांना लिहिलेली शेकडो पत्रे लक्ष देऊन वाचली. यानंतर त्यांनी बर्कशायरच्या वार्षिक बैठकांना हजेरी लावण्यास सुरु केली आणि कौशल्यावर त्यांनी वॉरेन बफे आणि नंतर त्यांच्यामुळे मुंगेर यांना मित्र बनविले.
11 / 12
जुलै 2007 मध्ये पबराय आणि त्यांचे मित्र गाय स्पायर यांनी बफे यांच्यासोबतच्या पॉवर लंचसाठी एक चॅरिटी ऑक्शन जिंकला. या दोघांसाठी 650,100 डॉलरची बोली काहीच नव्हती, ती त्यांनी बफे यांना दिलेली गुरुदक्षिणा होती.
12 / 12
पबराय यांनी केवळ बफे यांची शेअर बाजारातील कॉपी केली नाही, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कॉपी केली. जी त्यांच्या जीवनशैलीत स्पष्ट दिसते. बफेंसारखाच ते देखील वाचन आणि ऑनलाईन ब्रिज खेळण्यात वेळ घालवतात.
टॅग्स :share marketशेअर बाजारAmericaअमेरिका