Corona crisis suddenly needs money find out where funds can be arrange immediately
कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था? By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 8:23 PM1 / 10देशातील कोरोना संकटाने एवढे विक्राळ रूप धार केले आहे, की रोजच्या रोज लाखो लोक आजारी पडत आहेत. अनेक कुटुंबांना अचानकपणे आजारासाठी मोठ्या रकमेची गरज भासत आहे. यासाठी पैशांजी जुळवाजुळव करणे अत्यंत कठीण होते. तर जाणून घेऊयात, कुणाला अशी अचानकपणे पैशांची गरज पडलीच, तर कुठूण होऊ शकते पैशांची व्यवस्था... (Corona crisis suddenly needs money find out where funds can be arrange immediately)2 / 10रोख रकमेची पडते गरज - खरे तर अधिकांश लोकांकडे उपचारांसाठी हेल्थ इंशुरन्स पॉलिसी असतेच. मात्र, अनेक वेळा कॅशलेस उचारांसाठी उशीर लागतो. तसेच, कॅशलेस उपचारांशिवाय औषधींसारख्या अनेक प्रकारच्या आवश्यकतांसाठीही रोख पैशांची गरज पडते.3 / 10एक पर्याय क्रेडिट कार्ड - क्रेडिट कार्डचा वापर - आणीबाणीच्या काळात तत्काळ खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्डचाही वापर केला जाऊ शकतो. खरे तर क्रेडिट कार्डचा वापर करणे ही आदर्श अथवा चांगली पद्धत नाही. कारण यावरील व्याज दर प्रचंड असतो. 4 / 10कॅश काढण्यासाठीही क्रेडिट कार्ड एक पर्याय असू शकतो. मात्र, क्रेडिट कार्डने कॅश घेतल्यानंतर तत्काळ त्याच दिवसांपासून व्याज लागायला सुरुवात होते. तर कार्ड स्वाइप केल्यानंतर व्याज पुढील बिलिंग सायकलपासून लागायला सुरुवात होते, हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 5 / 10आपल्याला क्रेडिट कार्डच्या माध्यमाने अधिक पैसे खर्च करावेच लागत असतील, तर आपण हा खर्च ईएमआयमध्ये कन्व्हर्ट करून व्याज दराचे ओझे कमी करू शकतात.6 / 10'या' लोनला मिळते तत्काळ मंजुरी - पर्सनल लोन - पर्सनल लोन हा आणीबाणीच्या काळात रोख पैसे मिळविण्याचा उत्तम आणि लोकप्रिय पर्याय आहे. अनेक कंपन्या आपल्या चांगल्या ग्राहकांसाठी प्री-अप्रूव्ड पर्सनल लोनदेखील ऑफर करतात. अशा लोनला फारशा कागदपत्रांशिवायही तत्काळ मंजुरी मिळते. 7 / 10आपण आपल्या बँकेच्या ब्रांचला जाऊन अथवा फोनवर संपर्क साधून लोनसाठी अर्ज करू शकता. पर्सनल लोन थोडे महाग नक्कीच असते. मात्र, ग्राहकांच्या ग्रेडिट हिस्ट्रीच्या आधारे व्याजदर किफायतशीरही होऊ शकतो.8 / 10गोल्ड लोन सोपे अन् सुरक्षितही - आणीबाणीच्या काळात तत्काल पैसे मिळविण्यासाठी गोल्ड लोन सर्वात सोपे आणि सुरक्षित मानले जाते. सोने गहान ठेऊन आपण मिनिटांत लोन मिळवू शकतात. जर, एखाद्याचा क्रेडिट स्कोर खराब असेल, तर हा पर्याय सर्वात चांगला आहे.9 / 10इतरही काही पर्याय - आणीबाळीच्या काळात पैशांची गरज दूर करण्यासाठी इतरही काही पर्याय आहेत. जसे, की विमा पॉलीसी, म्यूचुअल फंड, शेअर अथवा एफडीच्या मोबदल्यात लोन. अशा प्रकारच्या लोनवर पर्सनल लोनच्या तुलनेत कमी व्याजदरात लोन मिळते. 10 / 10...याशिवाय आपण नोकरी करत असाल, तर आपल्या ऑफिसकडूनही अत्यंत किफायतशीर व्याज दरात लोन घेऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications