Corona Those who have not been vaccinated alert Vaccination has a direct connection with your salary
Corona Vaccination: कोरोना लस न घेणाऱ्यांनो, लक्ष द्या; व्हॅक्सिनेशनचं थेट तुमच्या सॅलरीसोबत आहे कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 1:16 PM1 / 10संपूर्ण जगात सध्या कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक देश लसीकरणावर भर देत आहे. मात्र आजही बरेच लोक आहेत जे लसीकरण करण्यापासून पळ काढताना दिसून येतात. लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत.2 / 10मात्र काही कर्मचारी ऑफिसला जायचं नाही घरूनच काम करायचं आहे मग लस का घ्यायची? या विचारात आहेत. परंतु तुम्हीही असा विचार करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होण्याची शक्यता आहे. नेमका हा परिणाम कसा होऊ शकतो हे जाणून घेऊया3 / 10अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरून लस घेतल्यास कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात बोलावणं सोप्प जाईल. अशातच कंपन्यांनी वॅक्सिनचे कनेक्शन थेट पगाराशी जोडलं आहे त्यामुळे कर्मचारी लस घेतील. 4 / 10भारतात मागील काही दिवसांपासून लसींच्या अभावामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक लोकांची लस घेतली आहे. देशातील ४.२ टक्के लोकसंख्येने म्हणजे ५.२७ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. तर ३२.७ कोटी लोकांनी एक डोस घेतला आहे. 5 / 10रोजगार क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञांच्या मते, देशातील बहुतांश कंपन्या पुढील ३-४ महिन्यात ऑफिस सुरु करू इच्छित आहेत. परंतु जोपर्यंत सर्व लोकांचे लसीकरण होत नाही तोवर कार्यालय सुरू करणं कठीण आहे. अशावेळी कंपन्या लसीकरणासाठी इसेंटिव, कमीशन आणि इनक्रिमेंट देत आहेत. 6 / 10कंपन्या त्यांच्य्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं लस देऊ शकत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे दबाव किंवा आमिष देऊन जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न करत आहेत. लसीकरणासाठी काही कंपन्यांनी सक्त कारवाईही सुरु केल्याचं दिसून येते. 7 / 10खेतान एँड कंपनीचे पार्टनर अंशुल प्रकाश सांगतात की, जे लोक वॅक्सीन घेत नाहीत, ते मोठ्या प्रमाणात कोरोना पसरवण्यासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे जर कोणत्या कर्मचाऱ्याने लसीकरण केले नाही तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर होऊ शकतो असं कंपन्यांनी स्पष्ट सांगितले आहे. 8 / 10एका औद्योगिक इंडस्ट्रियल फर्मचे सीनिअर एग्जिक्युटिव्ह यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करा असं सांगितले आहे. जर कोणताही कर्मचारी लस घेणार नसेल तर त्याला वर्षाची इनक्रिमेंट मिळणार नाही असं बजावलं आहे. 9 / 10एका कर्मिशियल सर्व्हिस कंपनीने म्हटलं आहे की, अनेक लोकांकडे लस न घेण्यामागे काहीही ठोस कारण नाही. त्यामुळे जर कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही तर त्यांच्या पगारातील ५ टक्के कापून घेणार आहोत असं त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 10 / 10कंपन्यांनी अशाप्रकारे लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती करत आहेत जेणेकरून येणाऱ्या काळात ऑफिस उघडल्यास कोणताही धोका होऊ नये आणि कंपन्यांना एकदा ऑफिस सुरू केल्यानंतर पुन्हा बंद करण्याची वेळ कंपनीवर येऊ नये. आणखी वाचा Subscribe to Notifications