शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार; टाटा समूहानं मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 3:56 PM

1 / 12
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.
2 / 12
उद्योगधंदे ठप्प झाल्यानं अनेकांच्या नोकरांवर कुऱ्हाड पडली आहे. तर काही कंपन्या कर्मचारी कपात करण्याच्या दृष्टीनं विचार करू लागल्या आहेत.
3 / 12
अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचं बजेट बिघडलं आहे.
4 / 12
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशाला १५०० कोटी रुपयांची मदत करणाऱ्या टाटा समूहालादेखील आता कोरोनाची झळ बसू लागली आहे.
5 / 12
कोरोनामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून टाटा समूहानं इतिहासात पहिल्यांदाच पगार कपातीचा निर्णय घेतला आहे.
6 / 12
टाटा सन्सचे अध्यक्ष आणि इतर कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पगार जवळपास २० टक्क्यांनी कापण्यात आले आहेत.
7 / 12
टाटा समूहातील महत्त्वाची आणि सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं सर्वात आधी त्यांचे सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या पगार कपातीची माहिती दिली. गोपीनाथन यांच्या पगारात १६ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
8 / 12
इंडिया हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांच्या पगारातही कपात केली गेली आहे.
9 / 12
टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल, व्होल्टासचे सीईओ आणि एमडीदेखील कमी पगार घेणार आहेत.
10 / 12
कंपनी चालू आर्थिक वर्षात अधिकाऱ्यांच्या बोनसमध्येदेखील कपात करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
11 / 12
टाटा समूहाच्या इतिहासात अशा प्रकारची वेळ आली नव्हती. मात्र सध्या परिस्थिती हाताळण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असं टाटा समूहातल्या एका सीईओंनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
12 / 12
शक्य असेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हितांचं रक्षण करणं ही टाटा समूहाची संस्कृती असल्याचं सीईओंनी सांगितलं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTataटाटा