शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: ज्या वस्तूंसाठी भारत होता अमेरिका-चीनवर अवलंबून त्याचेच देशात झाले विक्रमी उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 9:18 PM

1 / 10
कोरोना विषाणूच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र कोरोनाचे संकट टळल्यानंतर भारतातील अर्थचक्र वेगाने फिरून भारत हा निर्मिती उद्योगाचे केंद्र बन शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन महिन्यात घडलेल्या काही घटनांमुळे भारताला आपल्यातील सुप्त गुणांची जाणीव झाली आहे.
2 / 10
याविषयीची उल्लेखनीय बाब म्हणजे काही काळापूर्वी भारत ज्या वस्तूंसाठी चीनसह इतर देशांवर अवलंबून होता. त्याच वस्तूंची निर्मिती आता भारतात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
3 / 10
कोरोनाविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असलेली पीपीई किट्स त्यापैकीच एक आहे. मार्च महिन्यापूर्वी भारतात क्लास-३ लेव्हलच्या पीपीई किट्सची निर्मिती होत नव्हती. दरम्यान, आता मात्र पीपीई किट्सच्या निर्मितीबाबत भारत स्वयंपूर्ण देश बनला आहे.
4 / 10
यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतात दर्जेदार पीपीई किट्सची निर्मिती होत नसे. त्यातच कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्यानंतर भारतातही या विषाणूचा सामना करण्यासाठी तयारी सुरू झाली होती. सुरुवातीला पीपीई किट्सची आयात करण्यात आली. मात्र वाढती मागणी विचारात घेऊन देशातच पीपीई किट्सच्या निर्मितीस सुरुवात करण्यात आली.
5 / 10
दरम्यान, भारतात पीपीई किट्सचे उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले की, त्यामुळे एकेकाळी चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांवर अवलंबून असलेला भारत आता पीपीई किट्सच्या निर्मितीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
6 / 10
उल्लेखनीय बाब म्हणजे देशात अगदी माफक किमतीत पीपीई किटची निर्मितीकेली जात आहे. तसेच हे सर्व अवघ्या दोन महिन्यात साध्य झाले आहे. त्यात मार्च महिन्याच्या अखेरीस डब्ल्यूएचओने भारताला पीपीई किट्स बनवण्याची परवानगी दिली होती.
7 / 10
मिळालेल्या माहितीनुसार भारतात सध्या दरदिवशी एक लाख ७० हजार पीपीई किट्सची निर्मिती होत आहे. मात्र या पीपीई किट्सचे उत्पादन दोन लाखांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
8 / 10
वस्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी पीपीई किट्सच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. सध्या अनेक गारमेंट्स आणि जूट कंपन्यांना पीपीई किट्सच्या निर्मितीसाठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
9 / 10
आज भारतून निर्यात होऊ शकतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीपीई किट्स बनत आहेत. मात्र सध्या देशाची गरज विचारात घेऊन निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास जूनपर्यंत देशाला दोन कोटी पीपीई किट्सची आवश्यकता भासणार आहे.
10 / 10
दरम्यान, पीपीई किट्सच्या निर्मितीत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच या किट्ससाठी परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे. सध्या भारतातील पीपीई किट्सचा बाजार ७ हजार कोटींवर पोहोचला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था