CoronaVirus Marathi News state bank of india alert beware of fraud SSS
लॉकडाऊनमध्ये SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट! ...तर खातं होऊ शकतं रिकामं, वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 5:38 PM1 / 13कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण हे वाढले आहे. 2 / 13देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला असून वेळीच सावध केले आहे.3 / 13एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. फसवणुकीबाबत लोकांना सावधान केले आहे. 4 / 13काही भामटे बँक अधिकारी बनून ग्राहकांना फसवत असल्याचं म्हटलं आहे. अॅपच्या माध्यमातून ग्राहकांच्या फोन स्क्रीनचा रिमोट अॅक्सेस मिळवत असल्याचे यातून स्पष्ट करण्यात आले आहे. 5 / 13ग्राहक आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुठे तक्रार नोंदवू शकतात याबाबत बँकेने माहिती दिली आहे.6 / 13epg.cms@sbi.co.in आणि report.phishing@sbi.co.in. यावर तुम्ही मेल करून तक्रार दाखल करू शकता. त्याचप्रमाणे https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाईटवर जाऊन देखील तक्रार नोंदवता येईल. 7 / 13एसबीआयने काही फोटो पोस्ट करत काय करायला हवं आणि काय नको यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.8 / 13काही लोक बँक अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतात आणि सांगतात की तुमचं वॉलेट किंवा बँक केवायसी अवैध आहे आणि डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे. तुमची ही समस्या आम्ही ऑनलाईन सोडवू असं सांगून ते ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. 9 / 13ग्राहकांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर फसवणूक करतात याबाबत एसबीआयने ग्राहकांना माहिती दिली आहे. 10 / 13फोन कॉल/ई-मेल/एसएमएस/ वेब लिंकच्या माध्यमातून कोणालाही तुमचे बँक डिटेल्स देऊ नका असं बँकेने सांगितलं आहे.11 / 13इंटरनेटवर देण्यात आलेल्या बँकेच्या नंबरवरही विश्वास ठेऊ नका. बँके संबधित काही काम असल्यास बँकेचे अधिकृत फोन अॅप आणि वेबसाईट वापरा. 12 / 13YONO SBI, YONO Lite आणि BHIM SBI Pay अॅप आहेत. तर https://bank.sbi/ ही अधिकृत वेबसाईट आहे. 13 / 13ग्राहकांनी केवळ कस्टमर केअर टोल फ्री नंबर 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 आणि टोल नंबर- 080-26599990 यावरच संपर्क करावा. आणखी वाचा Subscribe to Notifications